
सटाणा : श्रीकांत रौन्दळ
येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून यशस्वी अशी शस्त्रक्रिया करीत एका महिलेचे सुलभ बाळंतपण केले आहे.
त्याचे असे झाले की, शहरातील सामाजिक कार्यकर्ते व लोकशाहीर भीमराव पवार यांच्या सुनबाई कोमल विजय पवार यांना बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिशय बिकट परिस्थिती असतानाही संबंधित वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून यशस्वीपणे शस्त्रक्रिया करीत सदर महिलेचे सुलभ बाळंत पण केले आहे. संबंधित महिला व तिचे बाळ दोन्हीही सुखरूप आहेत. दरम्यान संबंधित वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगत, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पवार, अमित सूर्यवंशी भूलतज्ञ डॉ. बहिरम व येथील पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचा लोक शाहीर भिमराव पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भारत बच्छाव, पोपट बच्छाव, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत रौंदळ, महेंद्र शर्मा, संजय दाणी, किशोर सोनवणे, कल्पना जाधव, शुभदा वाघ, रिजवान सय्यद, नागेश धीवरे इत्यादी उपस्थित होते.
Comments are closed.