NGN News
Latest Marathi News

नक्षत्र ज्योतिष विद्या मंडळाचा पदवीदान समारंभ उत्साहात

३० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नक्षत्र ज्योतिष विद्या मंडळ, नाशिक यांच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभ ॲड. प्रा. मिलिंद मधुकर चिंधडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. प्रा. चिंधडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या परिचयाने झाली. पाहुण्यांचा परिचय डॉ. लक्ष्मीकांत पाठक यांनी करून दिला, तर प्रास्ताविक डॉ. अभय अगस्ते यांनी केले. यावेळी बोलताना ॲड. प्रा. चिंधडे म्हणाले की, “संस्थेची आणि नाशिक शहराची ज्योतिष परंपरा अत्यंत समृद्ध आहे. नवीन पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी केवळ व्यवसायापुरते न राहता आयुष्यभर ज्योतिष अभ्यासक म्हणून सातत्याने अध्ययन करावे. मार्गदर्शनासाठी येणाऱ्या व्यक्तींना भीती दाखवू नये, तर त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करावे आणि त्याबदल्यात योग्य ती फी घ्यावी.”

या समारंभात जवळपास ३० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिर्विद श्री. सुरेश जोशी होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश जोशी यांनी संस्थेचा २७ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास उलगडून सांगत संस्थेच्या सुरुवातीच्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed.