NGN News
Latest Marathi News

‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ नाशकात भाजप रस्त्यावर

  • राहुल गांधी व काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध; महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या संख्येने सहभाग

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक :  महिलांना राजकीय क्षेत्रात अधिक प्रतिनिधित्व मिळावे आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने लोकसभेत सादर करण्यात आलेल्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या समर्थनार्थ तसेच काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या आंदोलनात भाजपच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाला बळ देणे, नारीशक्तीचा सन्मान करणे आणि महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के प्रतिनिधित्व देण्याच्या तरतुदीला पाठिंबा देणे हा आंदोलनाचा प्रमुख उद्देश होता.

    यावेळी आंदोलनकर्त्यांनी राहुल गांधी गो बॅक, नारी शक्तीला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो,‘नारीशक्ती जिंदाबाद’, ‘महिला सशक्तीकरणाचा विजय असो’, ‘नारी शक्ती वंदन अधिनियमाचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत आपली भूमिका मांडली.

        भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महिलांचा राजकीय सहभाग वाढविणे हा कोणत्याही पक्षीय राजकारणापेक्षा व्यापक राष्ट्रीय विषय असून, महिलांना निर्णय प्रक्रियेत समान संधी मिळणे हा त्यांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वाचा भाग असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. काँग्रेस व राहुल गांधी यांनी या विषयावर घेतलेल्या विरोधी भूमिकेबाबत भाजपच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनावेळी पुरुष कार्यकर्त्यांनी काळा शर्ट, तर महिला कार्यकर्त्यांनी काळी साडी युवतींनी काळा पोशाख परिधान केला होता. तसेच हातावर काळ्या रिबिनी बांधून निषेध व्यक्त करण्यात आला.

           आंदोलनास माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, आ.प्रा.देवयानी फरांदे, आ.ॲड.राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आडके, रोहिणी नायडू, स्वाती भामरे, भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, भाजपा नाशिक उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम, भाजपा नाशिक ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, प्रशांत जाधव, गिरीश पालवे, सुनील देसाई, शाम बडोदे, रश्मी हिरे – बेंडाळे, रंजना भानसी, दिपाली गीते, छाया देवांग, माधुरी बोलकर, रुपाली ननावरे, सोनाली कुलकर्णी, सोनाल दगडे, सुजाता करजगीकर नगरसेविका प्रियंका माने, प्रतिभा पवार, श्वेता भंडारी, चित्रा तांदळे, अमृता पवार, उषा बेंडकोळी, संध्या कुलकर्णी, रुपाली निकुळे, मंगला नन्नावरे, सोनाली पवार, संगिता घोटेकर, भारती धिवरे, अंकिता शिंदे, सीमा ताजने, प्रतिमा मोरे, अंजू चव्हाण, लता राऊत, उज्वला कोथळे, नीता भामरे, अरुणा देशमुख, पल्लवी शिंदे, मंदा गायकवाड, आरती भामरे, योगिता खताळे, सविता कोळगे, महेश हिरे, दिनकर अण्णा पाटील, धनंजय माने, गुरमित बग्गा, भुषण राणे, बाळकृष्ण शिरसाठ,  प्रवीण भाटे, शांताराम घंटे, वसंत उशीर, बबन ढगे, प्रशांत वाघ, शरद काकड,  चंद्रकांत खोडे, सुधाकर बडगुजर, निलेश बोरा, सतीश मोरे, बापुसाहेब पाटील, वैकुंठ पाटील, डॉ. मनोज बर्डे, समीर समदडीया, बापू गाडेकर, चेतन मोरे, नितीन जाधव, संतोष सोनवणे, राहुल खाडे, वसंत भडके, राहुल विधाते, महेश कुयटे, संजय सानप, संजय हिरे, प्रकाश महाले, राजू भडके, उत्तमराव उगले, रफिक शेख, सुनिल पनीकर, सुरेश मारु, प्रविण पाटील, नामा हाजी, राहुनल गणोरे, अमोल गांगुर्डे, व्यंकटेश मोरे, शंभू बागुल, अरुण दातीर, रुपाली मर्चंडे, ललिता भावसार, सोनाली राजे पवार, सुश्मीता लांडगे, नलिनी दराडे, ज्योती कवर, शर्वरी कुलकर्णी, गौरव बोडके, अर्चना दिंडोरकर, रोहिणी दळवी, महेंद्र पाटील, श्रीकृष्ण कुलकर्णी, शोभा गायकवाड, सांगिता पाटील, ज्योति पाटील, रुपाली कंडाळकर, नूतन पाटील, अश्विनी पाटील जान्हवी महाले महेश शेजवळ, किरण कुंदे, राकेश जाधव, सचिन आढाव, सचिन अग्रवाल, रविंद्र घोडके, पंकज खताळ तसेच यांच्यासह भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

           ‘नारीशक्ती ही राष्ट्रशक्ती असून महिलांना समान राजकीय संधी मिळाली पाहिजे. महिलांच्या सन्मानासाठी आणि राजकीय सक्षमीकरणासाठी भाजप सातत्याने कार्यरत राहील,’ असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. निषेध मोर्चात महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती.

Comments are closed.