
- सुरुवातीची किंमत १,२४,९९९ रुपये
- स्वदेशी अव्होर सोर्स तंत्रज्ञान स्टॅक आणि एव्हीआर वेईकल प्लॅटफॉर्मवर डिझाइन केलेली अव्होर इलेक्ट्रिकची पहिली मोटरसायकल लाँच.
- ईएक्स २एस, ईएक्स २ आणि ईएक्स १ या तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध.
- २६० किमी पर्यंतची आयडीसी श्रेणी, ११४ किमी/तास टॉप स्पीड.
- उद्योग क्षेत्रातील प्रथम एकात्मिक मोटर + स्विंगआर्म पॉवरट्रेन, १५०० वॅट ऑनबोर्ड फास्ट चार्जर आणि इंटेलिजण्ट रायडर तंत्रज्ञानाचा संच यात समाविष्ट आहे.
- १२० पेक्षा जास्त इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी नोंदणीसह तीन वर्षांत डिझाइन करण्यात आली आहे.
- ७९९ रुपयांपासून बुकिंग सुरू, २ महिन्यांनंतर डिलिव्हरीजना सुरुवात.
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
अव्होर इलेक्ट्रिक या समर्थ ई-मोबिलिटी समूहातील भारतामधील स्वदेशी, तंत्रज्ञानाला प्राधान्य देणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनीने आज आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल अव्होर इलेक्ट्रिक ईएक्स (अव्होर इलेक्ट्रिक एलिव्हेटेड एक्सपिरियन्स)च्या लाँचची घोषणा केली.भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या ईएक्स सिरीज चे अनावरण गुजरातचे माननीय मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.ईएक्स २एस, ईएक्स २ आणि ईएक्स १ या तीन व्हेरिएंट्समध्ये १,२४,९९९ रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेली ईएक्स स्वदेशी तंत्रज्ञान, इंटेलिजण्ट अभियांत्रिकी आणि दैनंदिन व्यावहारिकतेद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलिंगला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे नव्याने डिझाइन करण्यात आली आहे.इंटेलिजन्स दुचाकीमध्ये फक्त जोडलेली एखादी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट नसून ज्यावर ती संकल्पित केली आहे तो पायाच असावा या विश्वासावर तयार झालेल्या अव्होर इलेक्ट्रिकची संकल्पना एकाच मार्गदर्शक तत्त्वाभोवती रचली गेली आहे: इंटेलिजन्सपासून सुरुवात करा आणि मग त्याभोवती मोटरसायकल तयार करा. ब्रँडचे हे तत्त्वज्ञान त्यांच्या ‘इंटेलिजन्स बियॉन्ड मोशन’ या टॅगलाइनमधून दिसून येते.
अव्होर इलेक्ट्रिक ईएक्स डिझाइन शैली सादर करते, जी महत्त्वाकांक्षी आणि कालातीत आहे. विशेषतः भारतातील रायडर्ससाठी डिझाइन केलेली ही मोटरसायकल आयसीईकडून इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे होणारा बदल केवळ तंत्रज्ञानातच नाही तर रायडिंगची पद्धत, अर्गोनॉमिक्स आणि एकंदरीत मालकीच्या अनुभवात नैसर्गिक वाटायला लावते.ही मोटरसायकल विशिष्ट ड्युअल-टोन स्टाइलिंग, सिग्नेचर टँक लाइट्स आणि मॅन्युअल व ऑटोमॅटिक दोन्ही रायडिंग मोडच्या स्थिरतेद्वारे परिचित मोटरसायकलच्या प्रमाणांना आधुनिक ईव्ही अभियांत्रिकीशी जोडते. पारंपारिक मोटरसायकल प्रेमींना आकर्षित करताना आपल्या नेक्स्ट-जनरेशन इलेक्ट्रिक वैशिष्ट्यांचे आत्मविश्वासाने प्रदर्शन करण्यासाठी ही मोटरसायकल डिझाइन करण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या लाँचबाबत मत व्यक्त करत अव्होर इलेक्ट्रिकचे संस्थापक प्रियांक राखोलिया म्हणाले, ”ईएक्स लाँच करण्यापूर्वी आम्ही तीन वर्षे संशोधन, विकास, चाचणी आणि पडताळणी केली, ज्यामुळे या श्रेणीतील सर्वोत्तम अभियांत्रिकी आणि नाविन्यता सुनिश्चित करता येईल. विश्वासार्हता, सातत्य आणि आर्थिक सुलभता प्रदान करणाऱ्या भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी तंत्रज्ञान स्टॅकला नवीन उंचीवर नेताना आम्ही जागतिक दर्जाची सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करत आहोत. प्रत्येक भारतीयासाठी जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी उपायांचा वापर आणि पोहोच वाढवणे हे आमचे ध्येय आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, ईएक्स ही त्या दिशेने आमच्या प्रवासाची केवळ सुरुवात आहे.”
या विभागातील आकर्षकतेला नव्या उंचीवर घेऊन जात अव्होर ईएक्स सर्व ईव्ही पर्यायांमध्ये प्रीमियम ड्युअल-टोन रंगसंगती सादर करणारी पहिली मोटरसायकल ठरली आहे. ईएक्स २एस आणि ईएक्स २ व्हेरिएंट्स स्टारलिट ब्लू ड्युअल टोन, मीटेअर रेड ड्युअल टोन आणि स्टेलर ब्लॅक ड्युअल टोन या तीन ड्युअल-टोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असतील. दरम्यान, ईएक्स १ व्हेरिएंट स्टारलिट ब्लू, मीटेअर रेड आणि स्टेलर ब्लॅक या तीन सिंगल-टोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
अव्होर इलेक्ट्रिक ईएक्स पुढील महिन्यापासून भारतातील प्रमुख शहरांमधील शोरूम्समध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे, ज्यांचे बुकिंग अधिकृत अव्होर इलेक्ट्रिक वेबसाइटवर त्वरित सुरू होत आहे. ईएक्स २एस, ईएक्स २ आणि ईएक्स १ या तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेल्या या मोटरसायकलचे बुकिंग ७९९ रुपयांपासून सुरू होत असून ग्राहकांना या मोटरसायकलची डिलिव्हरी २ महिन्यांनंतर सुरू करण्याचे नियोजित आहे.अव्होर इलेक्ट्रिकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया त्यांच्या वेबसाइटला किंवा वेबसाइट, इंस्टाग्राम , फेसबुक, यूट्यूब वरील अधिकृत हँडल्सना भेट द्या.
Comments are closed.