NGN News
Latest Marathi News

कर्जबाजारीपण, कोसळलेले कांदा दर; शेतकऱ्याकडून टोकाचे पाऊल

  • बागलाणच्या राहुड गावातील गुलाब निकम यांची आत्महत्या

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

बाजारपेठेत कांद्याला मिळालेला कवडीमोल भाव शेतकऱ्याच्या जीवावर बेतला आहे. सटाणा तालुक्यातील राहुड येथील गुलाब केशव निकम ( ५९) नकक कांदा उत्पादक शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. वाढत्या कर्जबाजारीपणामुळे आधीच संकटात असलेल्या निकम यांना कोसळलेल्या कांदा दराने नाऊमेद केल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कळते.

प्राप्त माहितीनुसार,  निकम हे तीन एकर शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते, मात्र गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे ते अडचणीत आले होते. त्यातच परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने निकम यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. या दुहेरी संकटामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. याच नैराश्यातून अखेर त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे सटाणा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Comments are closed.