NGN News
Latest Marathi News

वसंत व्याख्यानमालेची शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : वसंत व्याख्यानमालेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवारी (दि. 25) सायं. 5:00 वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. सर्वे नंबर 512/3/47 लोकशाहीर गजाभाऊ बेणी मार्ग, समता नगर, ऋणानुबंध कार्यालय मागे, मुंबई आग्रा रोड, नाशिक येथे ही सभा होईल.

या सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करणे. सन २०२४-२५ व सन २०२५-२६ च्या आर्थिक हिशेब पत्रकास मंजुरी देणे. सन २०२४-२५ च्या सनदी लेखापरीक्षण अहवालास मंजुरी देणे. सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. सन २०२६-२७ च्या आर्थिक वर्षाकरिता सनदी लेखपालाची नियुक्ती करणे. माहे मे २०२६ मध्ये आयोजित व्याख्यानमालेच्या १०३ व्या वर्षाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे. मा. अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणारे विषय आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील. तरी सदर सभेस व्याख्यानमालेच्या सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालेचे चिटणीस हेमंत नथुजी देवरे यांनी केले आहे.

Comments are closed.