NGN News
Latest Marathi News

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. भिडे बिनविरोध 

  • अनिल देशपांडे पुरस्कृत विघ्नहर्ता पॅनलचे सर्व २१ उमेदवार विजयी

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक या संस्थेची २०२५ -२८ साठीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. वार्षिक सर्वसाधारण सभेत विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी ॲड.अविनाश भिडे पुन्हा बिनविरोध निवडून आले. अनिल देशपांडे ह्यांच्या नेतृत्वाखाली विघ्नहर्ता पॅनलचे महाराष्ट्राच्या विविध भागातील‌ सर्व २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 

  मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी (जुन्नर) व कुंदनकुमार साठे (पुणे), देणगीदार प्रतिनिधी सचिन निरंतर, आधारस्तंभ निखिल कुलकर्णी, आश्रयदाता प्रदीप भानुवंशे यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदी अनिल देशपांडे, प्रवीण कुलकर्णी, ॲड. सुहास भणगे, ॲड. समीर जोशी, सचिन पाडेकर, मुकुंद राक्षे, अनिल शिदोरे, सुजाता मवाळ, ॲड. संयोगिता पागे, मानसी फडके, हेमंत शुक्ल, अमित गोखले, सुनील बारसवडे, आमोद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल अभिनंदन होत असून लवकरच कार्याध्यक्ष, कार्यवाह व कोशाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे.

Comments are closed.