NGN News
Latest Marathi News

नाशिक हादरले ! निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

  • हेमंत गोविंद हेमाडे यांचे टोकाचे पाऊल; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : निवृत्त सहायक मोटार परिवहन ( आरटीओ ) अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून टोकाचा निर्णय घेतल्याने नाशिक शहर हादरले आहे. हेमंत गोविंद हेमाडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते गजबजलेल्या सिटी सेंटर मॉल परिसरात राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबिक करणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला.

प्राप्त माहितीनुसार, हेमाडे यांनी राहत्या घरात जीवन संपवले. गोळीबाराचा आवाज येताच परिसर हादरला. अनेकांनी हेमाडे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली, याची पोलीस शहानिशा करीत आहेत. तथापि, यामागे कौटुंबिक कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एका मोठ्या पदावरील अधिकाऱ्याने अशा प्रकारे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.