NGN News
Latest Marathi News

सीजी पॉवरने भारताची वीज पायाभूत सुविधा निर्मिती क्षमता केली अधिक मजबूत

  • मध्य प्रदेशातील सीहोर येथील भारतातील सर्वात मोठ्या ट्रान्सफॉर्मर निर्मिती प्रकल्पातून पहिला ट्रान्सफॉर्मर तयार
  • भारताची वीज पायाभूत सुविधा मजबूत करणे, ‘आत्मनिर्भर भारत’ला चालना देणे आणि भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी जागतिक दर्जाची ट्रान्सफॉर्मर निर्मिती क्षमता विकसित करण्याच्या सीजीच्या वचनबद्धतेला या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे अधिक बळकटी

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीची कंपनी आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग उद्योगातील प्रमुख कंपनी सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड (सीजी) ने आज मध्य प्रदेशातील सीहोर येथे उभारलेल्या आपल्या नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्पातून पहिला पॉवर ट्रान्सफॉर्मर तयार झाल्याची घोषणा केली.

५० एकर क्षेत्रावर विस्तारलेला हा प्रकल्प भारतामधील एकाच ठिकाणी असलेला सर्वात मोठा पॉवर ट्रान्सफॉर्मर निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पात २२० केव्ही ते १२०० केव्ही क्षमतेच्या श्रेणीतील पॉवर ट्रान्सफॉर्मर्सची निर्मिती केली जाणार असून, दरमहा ३५ पॉवर ट्रान्सफॉर्मर्स तयार करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. पहिला ट्रान्सफॉर्मर तयार झाल्याच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी मध्य प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव उपस्थित होते.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले, “आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी वीज हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अशा प्रकारचा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उच्च-दाब वीज पारेषण उपकरणांच्या क्षेत्रात भारताची क्षमता अधिक मजबूत करतो आणि वीजटंचाई असलेल्या देशापासून पुरेशा वीज उपलब्धतेच्या राष्ट्राकडे होणाऱ्या आपल्या परिवर्तनाला हातभार लावतो.

“याशिवाय, मध्य प्रदेशात अशा प्रकारची औद्योगिक गुंतवणूक स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करते आणि स्थानिक समुदायांच्या विकासाला हातभार लावते. सीजीच्या या प्रकल्पामुळे सीहोरमध्ये २,००० हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. मध्य प्रदेशात करण्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूक प्रस्तावाचे प्रत्यक्ष कारखान्यात रूपांतर व्हावे आणि त्याचा लाभ राज्यातील जनतेला मिळावा, यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्नशील राहील.”

सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडचे चेअरमन वेल्लयन सुब्बैया म्हणाले, “भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्यासोबत देशातील विजेची मागणीही वाढणार आहे. सीजी गेल्या जवळपास नऊ दशकांपासून ट्रान्सफॉर्मर्स आणि स्विचगियरसह इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा उपकरणांच्या क्षेत्रात आघाडीवर आहे आणि हीच समृद्ध परंपरा आमच्या सीहोर येथील नवीन प्रकल्पात प्रतिबिंबित होते.

“जगातील सर्वात मोठ्या पॉवर ट्रान्सफॉर्मर्सची निर्मिती करण्याच्या क्षमतेसह मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेला हा प्रकल्प पायाभूत सुविधा उपकरणांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यास मदत करेल. त्याचबरोबर भारताच्या निर्यातीतही या प्रकल्पाचे महत्त्वपूर्ण योगदान राहील.”

सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडचे ग्रुप सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर अमर कौल म्हणाले, “ऑगस्ट २०२५ मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झालेत्यावेळी हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची आम्ही वचनबद्धता व्यक्त केली होती. आज पहिला ट्रान्सफॉर्मर तयार होणे हे या प्रकल्पाच्या उभारणीत दाखवलेल्या वेगवान कार्यपद्धतीसहकार्य आणि जबाबदारीच्या भावनेचे ठोस फलित आहे.

“अवघ्या १३ ते १४ महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सज्ज करणे हे मध्य प्रदेश सरकारच्या भक्कम सहकार्यामुळे आणि आमच्या ‘एक्झिक्युशन एक्सलन्स इंजिन – सीजी एज’च्या माध्यमातून शक्य झाले. गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे उच्च मापदंड कायम ठेवत कामाचा वेग वाढवण्यासाठी विविध विभागांतील आमच्या टीम्सनी # वनसीजी या भावनेने एकत्रितपणे काम केले.”

सीहोर येथील हा प्रकल्प युटिलिटीज, डेटा सेंटर्स, रेल्वे, नवीकरणीय ऊर्जा, तेल आणि वायू तसेच वीज पारेषण पायाभूत सुविधा प्रकल्प अशा जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण क्षेत्रांना सेवा देण्याची सीजीची क्षमता अधिक मजबूत करेल. यासोबतच कंपनीच्या वेगाने वाढणाऱ्या निर्यात व्यवसायालाही या प्रकल्पामुळे मोठा पाठिंबा मिळणार आहे.

Comments are closed.