
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : दरवर्षी 5 सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांसाठी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात. प्रभू येशूच्या प्रार्थनेने झाली. प्रभू येशूची प्रार्थना नंदिनी या विद्यार्थिनींनी सादर केली त्यानंतर पवित्र ग्रंथ बायबल मधील वचने युक्ता या विद्यार्थिनीने पठण केली. विशेष प्रार्थना व या विद्यार्थ्यांनी सादर केली. यानंतर अनुक्रमे स्वागतपर भाषण, स्वागत गीत,. विद्यार्थ्यांनी सादर केली.तसेच वर्ग विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या वर्ग शिक्षकांसह शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात नृत्य, नाटिका तसेच विद्यार्थ्यांन नृत्य कौशल्य दाखवले. यानंतर विद्यालयाचे संस्थापक डॉक्टर ऑगस्टीन पिंटो, यांनी शिक्षकांसाठी दिलेल्या मौल्यवान संदेशाचे वाचन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील यांनी केले. शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तत्पर असावे. व आपल्या कार्यातप्रति निष्ठा बाळगावी. असा हा संदेश आदरणीय संस्थापक आगस्टीन पिंटो सरांनी दिला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील. माध्यमिक विभाग प्रमुख शीतल चिंचोलीकर प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख उषा शेट्टी व इतर शिक्षक वृंदांनी मार्गदर्शन केले .
Comments are closed.