
** एनजीएन न्यूज नेटवर्क
- बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा स्नेह आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश
नाशिक : भारतीय जनता पार्टी पाथर्डी मंडलाच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त राखी वाटप कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) सायंकाळी पाथर्डी फाटा येथील भाजी मंडई, साईबाबा मंदिर परिसरात करण्यात आले.
यावेळी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे तसेच भाजपा महानगर सरचिटणीस रश्मीताई हिरे-बेंडाळे यांच्या हस्ते महिलांना राखीचे वाटप करण्यात आले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा स्नेह आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन भाजपा पाथर्डी मंडल अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा महानगर सरचिटणीस डॉ. पुष्पा पाटील, संदीप दोंदे , राजेश्वरी दोंदे , सुभाष महाले, पंडित कडाळे, तेजस वाघ, राजश्री भावसार, ज्योती वायकर, अर्चना नवारकर, प्रेमकुमार फेगडे, हेमंत पवार, दगडू पाटील, माधव शेळके, भास्कर देसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Comments are closed.