
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
येथील श्री महावीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची इ.11 वी ची विद्यार्थिनी शर्वरी रत्नाकर आमले हिने नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. तिची जळगाव येथे होणाऱ्या विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तिला विद्यालयाचे क्रीडाप्रमुख राजेंद्र बनसोडे व क्रीडा शिक्षक प्रमोद हिलाल, उपशिक्षिका गायत्री पवार यांचे मार्गदर्शन लाभले. शर्वरी आमले हिचा विद्यालयातर्फे प्राचार्या सौ. पल्लवी पोरजे यांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी शर्वरी आमले व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष शांतीलाल जैन, माजी कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा , खजिनदार अजय ब्रम्हेचा, संचालक मोहनलाल बरडिया, महावीर चोपडा, अमित जैन, सुनिल आब्बड व संस्थेचे पालक प्रतिनिधी अक्षय ब्रम्हेचा आणि प्राचार्या सौ.पल्लवी पोरजे , पर्यवेक्षक शिवाजी धुमाळ, विभाग प्रमुख माळी मॅडम, स्वप्नील मुसळे, सचिन आहेर व सर्व शिक्षक- शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.
Comments are closed.