** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे विशाखा समितीची सभा संपन्न झाली. बालिका हक्क संरक्षण व कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत विद्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या कायद्याची माहिती कळावी. हा या विशाखा समितीचा मुख्य उद्देश आहे.
आजच्या या सभेला समाजसेविका नगरसेविका वैशाली दळवी , पालक प्रतिनिधी निशा यादव अंगणवाडी सेविका मनीषा बाविस्कर उपस्थित होत्या. विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्या विभाग प्रमुख शीतल चिंचोलीकर यांनी रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले. शिक्षिका अश्विनी सैद यांनी विशाखा समितीचा सभेचा उद्देश विशद केला. शिक्षिका जयश्री दीक्षित व रूपाली साबळे यांनी विद्यार्थी सुरक्षा समिती व माता पालक संघ समितीचा उद्देश विशद केला उपस्थित विद्यार्थिनींना मान्यवर अतिथी नगरसेविका वैशाली दळवी मार्गदर्शन केले. व या स्तुत्य उपक्रमाचे कौतुकही केले.
कार्यक्रमाची सांगता शालेय विद्यार्थी प्रतिनिधी श्रावणी ओझरकर हिने मान्यवरांचे आभार मानले व पुढील विशाखा समितीची सभा ऑक्टोबर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील विभाग प्रमुख शीतल चिंचोलीकर यांनी प्रयत्न केले.
Comments are closed.