
- संशयित सराफ व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाला तब्बल दोनशे तोळे सोन्याचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील फसवणुकीची रक्कम सुमारे दीड कोटी रुपये अस्ल्याची प्राथमिक माहिती आहे. यासंदर्भात संशयित सराफ व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुर्तडक कुटुंबातील तीन महिला अर्थात माजी महापौरांच्या पत्नी, मुलगी आणि सून मिळून दोनशे तोळे सोने होते. हे सोने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून दाभाडे याने १ जानेवारी २०२५ पूर्वी ताब्यात घेतले. त्यानंतरच्या सहा महिन्यांत संशयित दाभाडे याने संपर्क न ठेवता सोने दुपटीबाबत कोणतीही हालचाल न केल्याने महिलांना संशय आला. सदर प्रकार अशोक मुर्तडक यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी सराफाकडे मूळ दोनशे तोळ्यांची सोन्याची मागणी केली. मात्र त्यानंतर देखील दाभाडे हा टाळाटाळ करीत राहिला. अखेर दीड वर्षांच्या कालावधीनंतर संशयित सराफ दाभाडे याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चक्क माजी महापौरांच्या घरातील महिलांना एव्हढ्या मोठ्या प्रमाणात गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याने शहरभर या प्रकारची चर्चा सुरु आहे.
Comments are closed.