
- ज्येष्ठ विचारवंत व व्याख्याते अभय भंडारी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ समाजनेते आणि शिक्षणप्रेमी स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १८ व्या स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला १० ते १२ जुलैदरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता रावसाहेब थोरात सभागृह, के.टी.एच.एम. महाविद्यालयाजवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार आहे.
या व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत व व्याख्याते अभय भंडारी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. १० जुलै रोजी ‘युगाचार्य स्वामी विवेकानंद’, ११ जुलै रोजी ‘भारतीय संस्कृती आणि आजचा भारत’ तसेच १२ जुलै रोजी ‘भारतीय मातृशक्ती आणि तिची महान अपत्ये’ या विषयांवर ते व्याख्यान देणार आहेत.
ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे यांनी दिलेल्या योगदानाला अभिवादन म्हणून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. विचारांची समृद्ध परंपरा अनुभवण्यासाठी नागरिकांनी परिवार व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सीमा महेश हिरे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश (मुन्ना) रामराव हिरे, सरचिटणीस कृष्णराव नेरे तसेच ग्रामोदय शिक्षण संस्था व हिरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed.