
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लोहोणेर : पंडीत पाठक
चणकापुर धरणासह कळवण, देवळा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार मुसळधार पाऊस झाल्याने गिरणा नदीला पुर आला आहे. यामुळे देवळा तालुक्यातील विठेवाडी सावकी गावादरम्यान गिरणा नदीवर असलेल्या पुलावरुन पुराचं पाणी जात असल्याने सावकी खामखेडा गावांचा संपर्क तुटला आहे. गिरणा नदीला पूर आल्याने तालुका प्रशासनाने सतर्कता बाळगण्याच्या सुचना दिल्या आहेत.
गेल्या तीन चार दिवसांपासून विशेषतः काल रात्रभर कळवण, सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे,त्याचा परिणाम गिरणा नदी पात्रात चणकापुर धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे विठेवाडी , सावकी ,भऊर, खामखेडा,लोहोणेर,ठेंगोडा येथील परिसरात सतर्कता बाळगण्याच्या सुचना तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान गिरणा नदीवर विठेवाडी सावकी गावा दरम्यान असलेल्या या क्रॉफ्ट फाऊंडेशनच्या कमी उंचीच्या पुलावरून पुराचं पाणी दरवर्षी जात असतं. त्यामुळे गिरणा नदीच्या उत्तरेकडील गांवाच्या तालुक्याशी संपर्क तुटतो. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सदर पुलाची किमान एक मिटर उंची वाढवण्यासाठी अंदाज पत्रक तयार करून सदर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी विठेवाडी, सावकी, खांमखेडा येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Comments are closed.