NGN News
Latest Marathi News

विप्र फाउंडेशन जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण समारंभ उत्साहात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : विप्र फाउंडेशन, झोन १२ डी, नाशिक यांच्या वतीने सन २०२६–२८ या कार्यकाळासाठी नवनियुक्त नाशिक जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी नाशिक झोन १२ डी चे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा होते. प्रमुख पाहुणे म्हणून विप्र फाउंडेशनचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शामसुंदर जोशी व झुंबरलाल उपाध्ये उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून दुपट्टा व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

सन २०२६–२८ या कार्यकाळासाठी पुढील कार्यकारिणी अशी :

अध्यक्ष : पवन जोशी (पारिक)
उपाध्यक्ष : संजय पंचारिया
संघटन महामंत्री : विशाल जोशी
सह संघटन महामंत्री : भरत शर्मा
कोषाध्यक्ष : हेमेंद्र पारिक
सहकोषाध्यक्ष : प्रमोद व्यास
विधी व न्याय सल्लागार : ॲड. संतोष गौड
सांस्कृतिक मंत्री : दीपक पारिक
जनसंपर्क प्रमुख : मयुर शर्मा
प्रसिद्धी प्रमुख : योगेश जोशी
संघटन मंत्री : रुपेश खंडेलवाल
सह महामंत्री : गोविंद (जयप्रकाश) शर्मा, मनोज पालीवाल, संजय दायमा, किशोर खंडेलवाल व जयेन्द्र शर्मा
उप संघटन महामंत्री : सुशील शर्मा
मार्गदर्शक : देवकिसन व्यास

याशिवाय कविता शर्मा, बबीता बजरंगलाल शर्मा, अश्विनी पंचारिया, मनीषा विशाल जोशी (गुर्जरगौड), योगिता पारिक तसेच सरिता शर्मा यांची विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी अध्यक्षीय मनोगतात ओमप्रकाश शर्मा यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करत समाजहित, संघटन विस्तार, युवा सहभाग, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे शामसुंदर जोशी आणि झुंबरलाल उपाध्ये यांनीही विप्र समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटितपणे कार्य करण्याचा संदेश दिला.

नवनियुक्त अध्यक्ष पवन जोशी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने समाजोपयोगी, विधायक आणि सर्वसमावेशक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. समारंभास विप्र समाजातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, महिला भगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओमप्रकाश गौड संघटन महामंत्री व कोषाध्यक्ष विजय उपाध्ये यांनी समारंभाचे उत्कृष्ट नियोजन केले. उत्साह, आपुलकी आणि समाजसेवेचा दृढ संकल्प अशा वातावरणात हा पदग्रहण समारंभ यशस्वीरीत्या संपन्न झाला. विशाल जोशी यांनी आभारप्रदर्शन केले.

Comments are closed.