NGN News
Latest Marathi News

निदा खान हिला अखेर जामीन मंजूर

  • नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : मधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला असून नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयातून तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निदा एजाज खान हिच्यावर कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी तौसिफ बिलाल आत्तार यालाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र तौसिफविरोधात इतर 5 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली आहे. दरम्यान, संबंधित गुन्ह्यातील मुख्य संशयित दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. नाशिकमधील या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.