
- अडीचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक संचलित पू. पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंड, नाशिक यांच्या वतीने धनदाई बँकेट हॉल येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या अडीचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सत्कार समारंभ रविवार रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय टाटिया, संघपती मंगलचंद साखला, गौतम प्रसादी (स्नेहभोजन) सहयोगी अजित बोरा आणि बक्षीस सहयोगी बिजलाल कटारिया, विशेष अतिथी सीए. अक्षय राका अनीता बुरड, प्रमुख अतिथी चांदमल कोठारी, कांतीलाल बागमार, राजेंद्र बिनायक्या, नेमीचंद तातेड, दिग्विजय (रॉकी) चोपडा,अनिल बेदमुथा उपस्थित होते.
मुलांचे माता-पित्यांशी मजबूत संबंध निर्माण करण्याविषयी विशेष मार्गदर्शन जयेश तन्ना व शीतल तन्ना यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाला पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी फंडाचे कार्याध्यक्ष जे.सी. भंडारी यांनी स्वागत करताना सांगितले की, १९७८ मध्ये स्थापन झालेल्या श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाने गेल्या ४८ वर्षांत जैन ओसवाल समाजातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले असून हजारो गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळाली असून समाजातील शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम मोलाचा ठरला आहे. शिक्षण फंडाच्या सेक्रेटरी अँड. विद्युलता तातेड यांनी प्रास्ताविक करताना फंडाचा वार्षिक अहवाल सादर केला व विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
फंडाचे अध्यक्ष विजय वेदमुथा यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, शिस्त आणि पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. बदलत्या काळात प्रत्येकाने सातत्याने नवीन ज्ञान आत्मसात करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख प्रा. सीए लोकेश पारख यांनी प्रभावीपणे केले. विद्यार्थ्यांसाठी पारख क्लासेस आयोजित लकी ड्रॉ मधील विजेत्यांना सौ. आशा पारख व सौ. सपना पारख यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पूर्व अध्यक्ष मोहनलाल लोढा, शंकरलाल गांग, विनोद बेदमुथा, धन्नालाल बंब, हेमा लुंकड, संदीप गांग, निलेश भंडारी, राजेंद्र डुंगरवाल, सुषमा दुगड, निर्मला कोठारी, कन्हैयालाल बलदोटा, विजय डोशी, संदीप गांग, निलेश भंडारी, बालचंद संचेती, मगनलाल बागमार, सतीश बोरा, संगीता बाफणा, पंकज कोठारी, विकास कापसे, जयश्री दराडे, योगिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले
समारंभास समाजबांधव, पालक, विद्यार्थी व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
Comments are closed.