NGN News
Latest Marathi News

निदाकडून पिडीतेच्या मतपरिवर्तनाचे प्रयत्न, धार्मिक विधीचे सोपस्कारही..

  • एसआयटी तपासात निदा खान हिच्या काळ्या गुन्ह्यांची उकल

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : बहुचर्चित टीसीएस कंपनीतील लांगिक अत्याचार आणि धर्मपरिवर्तन प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या अटकेनंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) कसून चौकशी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने तिने पीडितेचे मतपरिवर्तन करण्यासोबतच तिच्या घरात जाऊन स्वतःच्या धर्माचे विधी पार पडल्याचे आणि पीडितेला विशिष्ट प्रार्थना करण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पीडितेचे मूळ नाव बदलून ‘हानिया’ असे नामकरण करण्याचा कट निदाने रचला होता. पीडितेला धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवण्यात आल्या, जेणेकरून तिचे पूर्णपणे मतपरिवर्तन करता येईल. पीडितेच्या घरी जाऊन तिला धार्मिक शिक्षण देणे, ठराविक पोशाख परिधान करायला लावणे आणि धर्माची प्रार्थना घेण्याचे धक्कादायक प्रकार निदाने केल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले आहे. निदाचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. तिने मोबाईलमधून डिलिट केलेले मेसेज, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पुन्हा रिकव्हर करण्यात येणार असून, त्यातून अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तसेच कॉल डिटेल्स, वारंवार संपर्कात असलेल्या व्यक्ती, फरार काळातील लोकेशन हिस्ट्री आणि प्रवासाचा तपशीलही SIT कडून तपासला जात आहे.

Comments are closed.