NGN News
Latest Marathi News

नांदगाव हादरले ! पोलीस असल्याची बतावणी करत तरुणीवर अत्याचार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : पोलीस असल्याचे भासवत तरुणीला फसवून तिच्यावर सलग पाच महिने वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी एका संशयित तरुणाच्या विरोधात जिल्ह्यातील नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणात आला आहे. संदीप कौतिक बेंडके असे संशयिताचे नाव असून तो सध्या फरार आहे.

प्राप्त माहितीनुसार, संदीप याने ओळख झालेल्या पिडीतेला आपण पोलीस असल्याची बतावणी करत प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला नांदगाव, शिर्डी, नाशिक रोड आदी ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान त्याने पिडीतेचे आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर पिडीतेने फसवणूक झाल्याप्रकरणी संशयित संदीप याच्याविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार संदीपचा शोध जारी आहे.

Comments are closed.