NGN News
Latest Marathi News

‘एनबीए’ च्या वतीने विविध क्षेत्रांतील ‘टीम लीडर्स’ सन्मानित

  • व्यावसायिक संस्थांतील सेवाव्रतींना पुरस्कार; ‘हॉटेल संस्कृती’च्या दत्तात्रय शेवाळे यांचा समावेश

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक बिझनेस असोसिएशन ( एनबीए ) च्या वतीने सलग दहा वर्षांहून अधिक काळ विविध व्यावसायिक संस्थांमध्ये कार्यरत राहून उत्कृष्ट योगदान देणाऱ्या ‘टीम लीडर्स’ना ‘पीलर ऑफ ऑर्गनायझेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने हा स्तुत्य उपक्रम राबवला.

गोविंदनगर येथील हॉटेल फोर पॉईंट्स येथे झालेल्या सोहळ्यात संगमनेरस्थित सह्याद्री अग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक नितीन हासे यांच्या हस्ते ‘टीम लीडर्स’चा सन्मान करण्यात आला. व्यायसायिक आस्थापनाच्या स्थैर्य आणि चढ्या प्रगती आलेखात दिलेले योगदान त्यासाठी प्रमाण मानण्यात आले. याप्रसंगी ‘एनबीए’चे अध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष शिवाजी मानकर, सचिव सुदर्शन गीते, कोषाध्यक्ष अमित पवार यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या सोहळ्याचे औचित्य साधून ‘प्रभावी मानव संसाधनासाठी योग्य दृष्टीकोन’ या विषयावर व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. तीमध्ये नितीन हासे यांनी मार्गदर्शन केले.

या सोहळ्यात हॉटेल संस्कृतीचे महाव्यवस्थापक दत्तात्रय शेवाळे यांचाही सन्मान करण्यात आला.

Comments are closed.