
- नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा उत्साहात; पद्मश्री चैत्राम पवार यांची उपस्थिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : फॅमिली फिजिशियन असोसिएशन अर्थात एफपीए नाशिक या संस्थेचा नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा, स्व.डॉ. वसंतराव गुप्ते स्मृती व्याख्यान गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा, होमिओपॅथी पुरस्कार, सुसंवाद प्रकाशन असा पंचरंगी कार्यक्रम स्प्लेंडर हॉल, नाशिक येथे प्रमुख अतिथी पद्मश्री. चैत्रामजी पवार यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
नुतन अध्यक्ष डॉ. विजय मुंदडा यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. डॉ.अविनाश पवार यांनी सचिव पदाचा व डॉ.मनिष पवार यांनी खजिनदार पदाचा पदभार तर शीतल सुरजुसे यांनी IPP पदाचा स्वीकारला. उपाध्यक्ष डॉ.तेजस्विनी सोलोमन , सहसचिव डॉ.रुपेश मर्दा , सहखजिनदार डॉ.ज्योती पाटील,संपादक डॉ.मंजुषा व्यवहारे सहसंपादक डॉ. सुनंदा मुंदडा संघटक डॉ.उत्पल राणे , सहसंघटक डॉ. अजय पाटील कार्यकारिणी सदस्य, डॉ. मनिषा मर्दा, मुक्तेश्वर जाधव, डॉ.राकेश शर्मा, डॉ भागवत सहाणे, डॉ राहुल पलोड, डॉ उज्ज्वला निकम, डॉ सागर घरटे, डॉ. प्रवीण अहिरराव, डॉ. राखी मुथा, डॉ. थेटे,डॉ.सुजाता धारणकर, डॉ आरती आहेर, डॉ अजय भंसाळी यांनी पदभार स्वीकारला. यावेळी निवड समिती सदस्य डॉ. शिरीष उपासनी, डॉ.विनोद गुजराथी,डॉ.प्रमोद आहेर, डॉ पंकज देवरे ,डॉ.संजय कोठावदे , तसेच सल्लागार समिती सदस्य डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ बी. बी. देशमुख, डॉ.संजय देवरे,, डॉ.प्रणिता गुजराथी,डॉ केदार मोरे यांचे सत्कार करण्यात आले.
डॉ. शिवराम हिरे आणि डॉ केदार मोरे यांना सॅम्युअल हॅनेमन होमिओपॅथी पुरस्कार प्रदान केला.
स्व.डॉ. वसंतराव गुप्ते स्मृती व्याख्यानाअंतर्गत पद्मश्री चैत्राम पवार यांनी फॅमिली डॉक्टरचे समाजातील स्थान व महत्व अधोरेखित केले. गावकऱ्यांची एकी, संस्कृती जतन, संवर्धन आणि वनभाजी महोत्सव सारखे विविध उपक्रम यावर ही त्यांनी आपले विचार मांडले. आपल्या कामाप्रती निष्ठा आणि तळमळ असावी असे आवाहनही त्यांनी केले. स्त्रियांनी शिक्षण,संस्कृती आणि संस्कार यांचा मेळ साधत आदिवासी सामाजिक जीवनात आमुलाग्र बदल घडवले .बारीपाडा या आदिवासी पंचक्रोशीचा विकास सामूहिक प्रयत्न आणि जनजागृती द्वारे शक्य झाल्याचा आणि त्या कामाची दखल घेऊनच सरकारने पद्मश्री पुरस्कार बहाल करण्याचा निर्णय त्यांनी नम्रतेने स्वीकारत तो बारीपाडा ग्रामस्थांना समर्पित केला. डॉ.अविनाश पवार आणि डॉ सुनंदा मुंदडा यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे पद्मश्री चैत्रामजी पवार यांचा जीवनप्रवास उलगडण्यास मदत झाली.
डॉ.मनिष पवार, डॉ. मनिषा मर्दा, डॉ. राणे, डॉ. जाधव, डॉ रुपेश मर्दा, यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमात रंगत आणली. डॉ सुनंदा मुंदडा यांनी पद्मश्री चैत्रामजी पवार यांचा सुंदर परिचय करून दिला. संस्थेचे माजी अध्यक्ष, डॉ. प्रमोद आहेर व डॉ.पंकज देवरे यांनी नुतन कार्यकारिणीची घोषणा केली. डॉ.राखी मुथा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.डॉ ज्योती पाटील यांनी सुसंवाद विषयी माहिती दिली.डॉ. मंजुषा व्यवहारे डॉ. राहुल पलोड यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याची धुरा सांभाळली. डॉ. पंकज देवरे यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार केले. तर डॉ.तेजू सोलोमन यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी सभागृहात संस्थेचे माजी अध्यक्ष, निवड समिती सदस्य, सल्लागार समिती सदस्य, सभासद-गुणवंत विद्यार्थी तसेच नाशिकमधील इतर वैद्यकीय संस्थांचे प्रतिनिधी, मित्रमंडळी व नातेवाईक उपस्थित होते.
Comments are closed.