
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय दागिन्यांचे ब्रँड अडावदकर ज्वेलर्स यांनी त्यांच्या भव्य तीन मजली दालनाचे अलीकडेच अत्याधुनिक आणि आकर्षक स्वरूपात रिलॉन्च केले. या नव्या दालनामध्ये ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण डिझाइन्स, आकर्षक व्हरायटी आणि अतिशय एक्स्क्लूसिव्ह कलेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
रिलॉन्च निमित्त ग्राहकांसाठी विशेष भरघोस सवलती जाहीर करण्यात आल्या असून, त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दालनाची अंतर्गत सजावट आधुनिक, प्रशस्त आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनुभवाची झलक देणारी आहे, ज्यामुळे ग्राहकांना एक प्रीमियम शॉपिंग अनुभव मिळत आहे.
या भव्य सोहळ्यास नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील अनेक मान्यवर, उद्योजक आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावली. उपस्थित मान्यवरांनी दालनातील नवीन डिझाइन्स आणि आकर्षक कलेक्शनचे विशेष कौतुक केले. या दालनाने नाशिकच्या ज्वेलरी क्षेत्रात एक नवीन मानदंड निर्माण केल्याचेही त्यांनी नमूद केले.
दालनात सादर करण्यात आलेल्या आधुनिक आणि ट्रेंडी डिझाइन्सनी ग्राहकांना विशेष भुरळ घातली असून, अनेक ग्राहकांनी या नाविन्यपूर्ण कलेक्शनची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे.
याशिवाय, येणाऱ्या अक्षय तृतीय निमित्त आणखी नवनवीन आणि आकर्षक डिझाइन्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, सर्व ग्राहकांनी दालनाला भेट देऊन या खास कलेक्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन अडावदकर ज्वेलर्स तर्फे करण्यात आले आहे. अडावदकर ज्वेलर्सचे हे नवीन दालन ग्राहकांसाठी केवळ खरेदीचे ठिकाण नसून, एक प्रीमियम ज्वेलरी अनुभव देणारे आकर्षण केंद्र बनले आहे.
Comments are closed.