
- एसी आणि ५५” किंवा त्यापेक्षा मोठ्या क्यूएलईडी टीव्हीवर मिळवा ५०%* पर्यंत भारी सू
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अक्षय तृतीयेला, भारतातील विश्वासार्ह ओम्नी-चॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा समूहातील एक ब्रँड, क्रोमा तुमच्या सण-उत्सवाच्या खरेदीला एका ‘सुवर्ण संधी’मध्ये बदलत आहे. क्रोमामध्ये एअर कंडिशनर्स, मोठ्या स्क्रीनचे टेलिव्हिजन, साऊंडबार आणि इतर उत्पादनांवर ५०% पर्यंतची घवघवीत सूट* मिळत आहे. १९ एप्रिल रोजी उपलब्ध असलेल्या या मर्यादित कालावधीच्या ऑफर्समध्ये तुम्हाला मिळेल भरघोस सवलत, कॅशबॅक, एक्सचेंज बेनिफिट्स आणि सुलभ ईएमआय देखील! या संधीचा लाभ घ्या आणि आपल्या घराला अपग्रेड करण्याची ही सुवर्णसंधी अजिबात सोडू नका. इतकेच नाही तर, टाटा नेउ एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड धारकांसाठी निवडक अॅपल आणि गुगल उत्पादनांवर ‘नेउकॉइन्स’च्या स्वरूपात १०% पर्यंत बचतीची आकर्षक संधी देखील उपलब्ध आहे.
क्रोमाच्या ‘कूलिंग डील्स’ उन्हाळ्याला करतील नामोहरम! भीषण उन्हाळ्यात क्रोमा देत आहे सुखद थंडावा! इन्व्हर्टर एअर कंडिशनर्सवर मिळवा अद्भूत ऑफर्स. सोबतच, निवडक मॉडेल्सवर किमान २ ईएमआय फ्री आणि ८,५०० रुपये पर्यंतचा एक्सचेंज बेनिफिट. ब्लूस्टार 1.5टी इन्व्हर्टर एसी आता ४३% सवलतीसह ३४,४९०* रुपये या किमतीत उपलब्ध आहे, तर क्रोमा 1टी इन्व्हर्टर एसी २६,५९०* रुपयांमध्ये मिळत आहे. सॅमसंग 1.5 टी इन्व्हर्टर एसी वर ५१%* सवलत देत ते ३८,९९०* रुपये या आकर्षक किमतीत उपलब्ध आहे, तर गोदरेज 1.5 टी इन्व्हर्टर एसी केवळ २८,३८३* रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. मोठी स्क्रीन, मोठी बचत या ऑफरअंतर्गत घरबसल्या मनोरंजनाचा जादुई अनुभव घेता येणार आहे. एलजी, सॅमसंग, सोनी आणि क्रोमा सारख्या टॉप ब्रँड्सच्या ५५-इंच आणि त्यापेक्षा मोठ्या टीव्हीवर किमान २५% सूट मिळत आहे. सॅमसंग 55-इंच क्यूएलईडी 4के टीव्ही आता ४१% सवलतीसह ५०,९९०* रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोनी च्या ‘पे ऍझ पर स्क्रीन साइज’ ईएमआय ऑफरनुसार ५५-इंच टीव्ही केवळ ५,५०० रुपये प्रति महिना (३० महिन्यांसाठी) मिळू शकतो. एआय-पावर्ड क्यूएलईडी/ क्यूएनईडी टीव्ही फक्त २,९९९ रुपये प्रति महिन्यापासून सुरू होत आहेत, तर ७५-इंच आणि त्यापेक्षा मोठ्या टीव्हीवर १ ईएमआय फ्री ऑफरही आहे. सणांचा आनंद द्विगुणित करत, २५,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या उत्पादनांवर ३,२०० रुपयांपर्यंत बचतीसह फ्लॅट १०% सूट दिली जात आहे. ही ऑफर एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, टेलिव्हिजन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनच्या निवडक रेंजवर लागू आहे. यासोबतच निवडक कॅटेगरी आणि ब्रँड्सवर १५,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळत असून, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सर्व एमएसीबुक वर १०% विशेष सवलत दिली जात आहे.
इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले, “अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहक समृद्धी आणि दीर्घकालीन मूल्य देणारी गुंतवणूक करतात. आमच्या ‘गोल्डन ऑफर्स’च्या माध्यमातून आम्ही उन्हाळ्यासाठी आवश्यक उपकरणे आणि अत्याधुनिक होम एंटरटेनमेंटवर सर्वोत्तम डील्स घेऊन आलो आहोत. आता आमच्या ग्राहकांसाठी दर्जेदार आणि अर्थपूर्ण अपग्रेडसह हा सण साजरा करणे अधिक सहजशक्य होईल.”
या फेस्टिव्ह ऑफर्सचा लाभ संपूर्ण भारतातील सर्व क्रोमा स्टोअर्समध्ये मर्यादित कालावधीतच घेता येईल. क्रोमा प्रत्येक बजेटमधील ग्राहकांना उत्तम किमतीत प्रीमियम तंत्रज्ञान मिळवण्याची सुवर्णसंधी देत आहे.
*अंतिम किमतींमध्ये लागू बँक कॅशबॅक, जुन्या उपकरणांचे एक्सचेंज मूल्य आणि जिथे लागू असेल तिथे अतिरिक्त एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.
Comments are closed.