
- एसआयएफ फंडाने स्वतः विकसित केलेल्या प्रारुपाच्या ‘लाँग-शॉर्ट’ समभाग धोरणाद्वारे, शेअर बाजाराच्या विविध चढउतारांमध्ये उच्च परतावा (दीर्घकालीन ‘अल्फा’) मिळवण्याचे उद्दिष्ट राहणार. यामध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक केली जाणार
- शिस्तबद्धरित्या समभागांच्या निवडीवर आधारित असलेल्या या धोरणाचे उद्दिष्ट ‘लाँग’ (खरेदी) आणि मर्यादित ‘शॉर्ट’ (विक्री) धोरणांमध्ये गतिशील वाटप करणे हे आहे. यामध्ये बाजारातील चढ-उतार नियंत्रित करण्यासाठी विशिष्ट जोखीम निकषांचा वापर केला जातो. हे धोरण ‘घटक आधारित’ पद्धतीचा अवलंब करेल, ज्याचा उद्देश बाजारातील संधींचा लाभ घेणे आणि त्याचवेळी बाजार कोसळल्यास होणारे नुकसान कमी करणे हा आहे.
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
फ्रँकलिन टेम्पलटन (इंडिया) ने आज स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स (एसआयएफ) अंतर्गत आपली पहिली योजना सफायर इक्विटी लाँग-शॉर्ट एसआयएफ योजनेचा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली. एसआयएफ नियमावलींतर्गत आणण्यात आलेली ही योजना इक्विटी लाँग शॉर्ट फंड आहे. हा फंड लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप श्रेणीमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूक करण्यासाठी निफ्टी ५०० निर्देशांकातील समभागांमध्ये गुंतवणूक करतो. या फंडाचे मुख्य उद्दिष्ट मार्केटच्या चढ-उतारांमध्ये दीर्घकालीन भांडवलवृध्दी आहे. हा फंड स्वतः विकसित केलेल्या गणितीय आणि आकडेवारीच्या प्रारुपावर आधारित असून त्यात अतिशय विचारपूर्वक समभागांची निवड, गरजेनुसार गुंतवणुकीचे प्रमाण बदलणे आणि गुंतवणुकीतील धोका कमी करण्यासाठी नियमांचे कसोशीने पालन केले जाते. या फंडाचा एनएफओ (न्यू फंड ऑफर) गुंतवणुकीसाठी १० एप्रिल २०२६ पासून खुला होणार असून २४ एप्रिल २०२६ ला बंद होणार आहे.
फ्रँकलिन टेम्पलटन – इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवलेकर (Satwalekar) या फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना म्हणाले, आजचा शेअरबाजार हा खूप वेगाने बदलत चालला असून गुंतवणूकदारांसाठी शिस्तबद्ध आणि लवचिक गुंतवणूक धोरण राबविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. एसआयएफ फंड्स अधिक जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी बनविण्यात आलेला असून यामध्ये उच्च परतावा मिळण्याची शक्यता असते आणि हा फंड कर कार्यक्षम देखील आहे. सर्वसामान्य म्युच्युअल फंड आणि एसआयएफमधील सर्वात मोठा फरक म्हणजे हा फंड आपल्या एकूण मालमत्तेच्या २५ टक्क्यांपर्यंतची रक्कम ‘शॉर्ट’ (बाजार घसरणीची शक्यता) पोझिशन्स उभ्या करण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे बाजारातील घसरणीच्या काळात तोट्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
ते पुढे म्हणाले की, ‘सफायर इक्विटी लाँग-शॉर्ट एसआयएफ हा फंड फ्रॅकलिन टेम्पलटनच्या पद्धतशीर आणि सांख्यिकीय गुंतवणुकीतील अनेक दशकांच्या अनुभवावर आधारित आहे. हा फंड समभागांची निवड करण्यासाठी डेटा आधारित तांत्रिक प्रारुपाचा वापर करतो आणि यामध्ये गुणवत्ता, मूल्य, गुतवणूकदारांचा कल, पर्यायी संकेत आदी ४० पेक्षा अधिक घटकांचा विचार केला जातो, तसेच ‘शॉर्ट’ ची (विक्री) संधी शोधण्यासाठी विशेष तांत्रिक आराखडाही तयार करण्यात आलेला आहे. हा फंड शेअरबाजारातील संधी शोधताना ‘लाँग-शॉर्ट’ पद्धतीचा वापर करतो. त्यामुळे गुंतवणुकीतील जोखीम अतिशय कार्यक्षमतेने हाताळली जाते.
सफायर इक्विटी लाँग-शॉर्ट एसआयएफचे पोर्टफोलिओ मॅनेजर अरिहंत जैन म्हणाले की, या फंडासाठी वापरले जाणारे ‘क्वांटिटेटिव्ह मॉडेल’ हे समभागांचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक आगाऊ माहिती देणारे (‘लीडिंग’) आणि नंतर माहिती देणाऱ्या (‘लॅगिंग’) विविध संकेतांचा वापर करते. बाजाराच्या बदलत्या परिस्थितीत वेगवेगळे घटक वेगवेगळ्या प्रकारे कामगिरी करत असते आणि हे ओळखून हे प्रारुप तयार केलेले आहे. हे प्रारुप दीर्घकालीन गुंतवणूक आणि निवडक शॉर्ट पोझिशनिंग या दोन्हींसाठी समभागांना गुण आणि क्रमवारी प्रदान करते आणि त्यामुळे बाजारातील बदलांना अधिक संतुलित प्रतिसाद देणे शक्य होते. जोखीम व्यवस्थापनावर मजबूत भर कायम ठेवत बाजारातील परिस्थितीनुसार जुळवून घेण्यासाठी हे प्रारुप तयार करण्यात आलेले आहे.
“पोर्टफोलिओची उभारणी अतिशय शिस्तबद्ध आणि संशोधनावर आधारित प्रक्रियेद्वारे केली जाते. यामध्ये फंडाची गुंतवणूक टीम रोखता, क्षेत्रनिहाय गुंतवणूक, गुंतवणुकीचा आकार, जोखीम आणि शैली यांसारख्या बाबींचा काळजीपूर्वक विचार करून स्वतःच्या अनुभवाचा आणि निर्णयाचा वापर करते. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये कोणताही अनावश्यक कल निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाते. खऱेदी करताना अथवा विक्री करताना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विविध घटकांचा वापर करत हे धोरण अधिक प्रभावीपणे शेअरबाजारातील प्रवाहाला अनुसरून संधी व्यक्त करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे आव्हानात्मक किंवा घसरणीच्या काळातही अल्फा परतावा (बाजार घसरणीतही चांगला परतावा) सुरक्षित राहू शकणार आहे. आमचे वेगळेपण हे ‘डायनॅमिक फॅक्टर इन्साइट्स’ आणि ‘जोखीम व विविध गुंतवणूकीच्या स्थितीवरील नियंत्रण’ यांचा मिलाफ घडवून आणते. त्यामुळे बाजारपेठेतील विविध चढ-उतारांमध्येही स्थिरता राखून विशिष्ट संधींचा लाभ घेणे शक्य होणार आहे.”
Comments are closed.