NGN News
Latest Marathi News

रोजचा लूक खास बनवण्यासाठी ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ नाशकात

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

कमी वजनातील आकर्षक आणि आधुनिक दागिन्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’चे नवे स्टोर आता नाशिकमध्ये सुरू झाले असून, या स्टोअरच्या माध्यमातून नाशिकमधील ग्राहकांना ट्रेंडी, स्टायलिश आणि रोजच्या वापरासाठी योग्य अशा दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध होणार आहे.नवीन स्टोअर, नाशिकमध्ये द लिव्हीन स्पेसेस, शरणपूर गावठाण येथे आहे. या स्टोअरमध्ये कमी वजनाचे सोन्याचे व डायमंड दागिने, आधुनिक डिझाइन्स आणि सध्याच्या ट्रेंडनुसार तयार केलेले संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

या स्टोअरमध्ये, नव्या पिढीच्या पसंतीच्या सुंदर आणि आकर्षक डिझाइन्सचा समावेश असून, रोजच्या वापरासाठी तसेच खास प्रसंगांसाठीही योग्य अशा दागिन्यांची आकर्षक रेंज सादर करण्यात आली आहे. विशेषतः तरुण आणि कामकाजी वर्गाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे.उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर शून्य कपात तसेच अतिरिक्त ३% लाभ देण्यात येत आहे. नाशिकसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात या नव्या स्टोअरच्या माध्यमातून ब्रँडने आपल्या विस्ताराला आणखी गती दिली आहे.

Comments are closed.