
- विशेष सभेमध्ये नूतन कार्यकारिणी घोषित; संस्थेच्या राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : रिअल इस्टेट क्षेत्रातील एक प्रमुख संस्था National Real Estate Development council अर्थात नरेडको नाशिकच्या अध्यक्षपदी शंतनू देशपांडे तर सचिवपदी भाविक ठक्कर यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या एका विशेष सभेमध्ये नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. याप्रसंगी संस्थेच्या राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहिली.
नूतन कार्यकारिणीती उपाध्यक्षपदी उदय शाह, मर्जयान पटेल तर खजिनदारपदी भूषण महाजन यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी नरेडकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजन बांदेलकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रशांत शर्मा, नवनिर्वाचित अध्यक्ष कमलेश ठाकूर, उपाध्यक्ष jayesh ठक्कर, हितेश ठक्कर, घनश्याम ढोकणे, राजेंद्र पाटे, पंकज कोठारी, अरविंद खबाळे, दिनेश दोशी, विदर्भ प्रांताध्यक्ष कुणाल पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली.
सभेमध्ये नरेडको नेक्स्टजेन ( २०२६-२८ ) कार्यकारिणीची देखील घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी रुचिक शिरोडे तर सचिवपदी vishal कोठावदे यांची निवड करण्यात आली. सभेत मावळते अध्यक्ष सुनील गवादे यांनी आपल्या दोन वर्षांतील कारकीर्दीचा आढावा घेतला. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.