NGN News
Latest Marathi News

इसुझू मोटर्स इंडिया’द्वारा ‘इसुझू आय-केअर प्री-समर कॅम्प’ ची घोषणा

  • 23-28 मार्च 2026 दरम्यान अधिकृत विक्रेता सेवा केंद्रांवर रोमांचक सेवा लाभ* मिळविणे शक्य

नाशिकएनजीएन न्यूज नेटवर्क

सर्वोत्तम सेवा आणि मालकीचा अनुभव देण्याच्या इसुझूच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याच्या निरंतर प्रयत्नातइसुझू मोटर्स इंडिया आपल्या इसुझू डी-मॅक्स पिक-अप्स आणि एसयूव्हीच्या श्रेणीसाठी देशव्यापी इसुझू आय-केअर प्री-समर कॅम्प आयोजित करणार आहे. या सेवा शिबिराचा उद्देश ग्राहकांना देशभरातील हंगामात त्रास-मुक्त वाहन चालविण्याच्या अनुभवासाठी रोमांचक लाभ आणि प्रतिबंधात्मक देखभाल तपासणी उपलब्ध करून देणे हा आहे.

दिनांक 23 ते 28 मार्च 2026 दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) सर्व इसुझू अधिकृत विक्रेता सेवा केंद्रांवर ‘इसुझू केअर’च्या पुढाकाराने उन्हाळीपूर्व शिबिराचे आयोजन केले जाईल. ग्राहकांना या कालावधीतत्यांच्या वाहनांसाठी विशेष ऑफर आणि लाभ देखील मिळवता येतील. शिबिराला भेट देणाऱ्या ग्राहकांना अनेक आकर्षक लाभ मिळणार आहेत. यामध्ये 37 केंद्रांवर मोफत सर्वसमावेशक तपासणीची सुविधा उपलब्ध असेल. तसेच मजुरीवर 10% सवलत, सुट्ट्या भागांवर 5% सवलत आणि वंगण तसेच इतर द्रव पदार्थांवरही 5% सवलत दिली जाईल. याशिवाय रिटेल आरएसएवर 20% सवलत, प्रोकेअर  वर 5% सवलत आणि विस्तारित वॉरंटीवर 20% सवलतीचा लाभ घेता येईल. ग्राहकांना ‘रिजेन’ ही सेवा देखील मोफत दिली जाईल.

आग्राअहिल्यानगरअहमदाबादअंबिकापूरअनंतपूरबारामुल्लाबरेलीबारमेरभरुचभटिंडाबेंगळुरूभोपाळभुवनेश्वरबिकानेरबिलासपूरकालिकतछत्रपति संभाजी नगरचेन्नईचिकमंगरूळकोइम्बत्तुर, धुळे, दिल्ली, दिब्रुगढदिमापूरदुर्गापूरएर्नाकुलमगांधीधामगोरखपूरगुरुग्रामगुवाहाटीहावडाहुबळ्ळीहैदराबादइंदूर (2), जयगावजयपूरजालंधरजम्मूजोधपूरकडप्पाकलबुर्गीकर्नालकायमकुलमखम्ममकोल्हापूरकोलकाताकोट्टायम, करनूल, लातूर, एलबी नगर (हैदराबाद), लेहलखनऊलुधियानामदुराईमंडीमंगळुरूमेहसाणामोहालीमुंबई (नेरुळ आणिबोरिवली)मुंद्राम्हैसूरनागपूरनाशिकनेल्लोरनिजामाबादनोएडापटणापुणेरायपूरराजमुंद्रीराजकोटरत्नागिरीसाताराशिवमोगासीकरसिलीगुडीसोलापूरसुरतथेनीत्रिसुरतिरुनेलवेलीतिरुपतीत्रिचीतिरुवनंतपुरमवडोदराविजयवाडा आणि विजयपट्टणम येथे असलेल्या आयसुझूच्या सर्व अधिकृत सेवा सुविधांवर प्री-समर कॅम्प आयोजित करण्यात येईल.

ग्राहकांना आपल्या जवळच्या इसुझू विक्रेता दालन किंवा https://www.isuzu.in/servicebooking.html वर भेट देऊन सेवा नोंदणी (सर्व्हिस बुकिंग) करता येईल. ग्राहक अधिक माहितीकरिता 1800 4199 188 (टोल फ्री)वर संपर्क करू शकतात.   

Comments are closed.