- गॅसचा पुरवठा अत्यंत मर्यादित झाल्याने उद्योजकांमध्ये चितेचे वातावरण
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहेत. या स्थितीच्या झाला उद्यमनगरी नाशिकला बसण्याची शक्यता गडद झाली आहे. अंबड आणि सातपूर औद्योगिक परिसरातील अनेक कंपन्यांकडे केवळ एक दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उरला असतानाच गॅस पुरवठादार कंपन्यांकडून उद्योजकांना अधिकृत ई-मेल पाठवून अनिश्चित काळासाठी गॅस पुरवठा सुरळीत होऊ शकणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. परिणामी, अनेक कंपन्यांना उत्पादन तात्पुरते थांबवावे लागण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागणार आहे.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण- इस्रायमधील संघर्षामुळे जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठा साखळीवर निर्माण झालेल्या तणावामुळे एलपीजी (LPG), पीएनजी (PNG) आणि औद्योगिक गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीची झळ नाशिकमधील औद्योगिक परिसरातील आस्थापनांना बसत आहे. बहुसंख्य उद्योगांना एलपीजी, पीएनजी आणि एमएनजीएल (MNGL) गॅसवर उत्पादन प्रक्रिया चालवावी लागते. मात्र सध्या गॅसचा पुरवठा अत्यंत मर्यादित झाल्याने उद्योजकांमध्ये चितेचे वातावरण आहे.
हॉटेल व्यवसायाला देखील फटका
दरम्यान, गॅस टंचाईचा फटका नाशिक शहरासह जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाला देखील बसला आहे. जिल्हाभर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वधारला असताना गॅस टंचाईमुळे तो ठप्प झाला आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी हॉटेल आणि रेस्तराँ चालकांच्या ‘आभार’ संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
Comments are closed.