- ६,६०० शाळांमधील केजी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या छोट्या कलाकारांनी सर्जनशीलतेला सीमा नसल्याचे केले सिद्ध
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या युवातर्फे आयोजित ‘युवा मास्टरस्ट्रोक’च्या २२व्या पर्वाची यशस्वी सांगता झाली. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत या अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नर्सरीपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने चित्रकलेच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि विचार व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.
दोन दशकांहून अधिक काळापूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आज एका सर्जनशील चळवळीत परिवर्तित झाला आहे. २०२५च्या पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतभरातील ६,६००हून अधिक शाळांमधील २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने या स्पर्धेत सहभाग घेतला. केवळ प्रतिभेचा गौरव करणे इतकेच या उपक्रमाचे उद्दिष्ट नसून, कलेच्या या सर्वांना समजणाऱ्या माध्यमातून विद्यार्थी गुंतागुंतीचे विचार आणि भावना व्यक्त करण्यास चालना देणारी संस्कृती घडवण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. सहभागींचे केजी ते इयत्ता तिसरी (गट अ), इयत्ता चौथी ते इयत्ता सहावी (गट ब) आणि इयत्ता सातवी ते इयत्ता दहावी (गट क) अशा तीन वयोगटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते.युवा मास्टरस्ट्रोक २०२५ या स्पर्धेच्या प्रत्येक वयोगटातील विजेत्यांची नावे https://masterstroke.navneet.com/ या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहेत.
श्री. भारत पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय प्रवेशिकांचे परीक्षण करण्यात आले. जे. जे. कला महाविद्यालयाची पार्श्वभूमी आणि कला क्षेत्रातील अनेक दशकांचा अनुभव असलेल्या श्री. पार्टे यांनी चित्रकृतींचे परीक्षण केले आणि या स्पर्धेचा एकूण उत्साह अधिक उंचावला.विजेत्यांनी आपापल्या विभागांत कल्पकतेचा सर्वोच्च बिंदू असल्याचे अधोरेखित केले. या गुणवान विद्यार्थ्यांपर्यंत बक्षिसे व अधिकृत मानपत्रे पोहोचावी, यासाठी युवातर्फे शाळा व्यवस्थापन व स्थानिक सेल्स टीमसोबत काम करण्यात येत आहे. आतापर्यंत ४०,००० विजेत्यांना गिफ्ट हॅम्पर मिळाले आहेत.जिल्हास्तरीय फेऱ्या खास महाराष्ट्र व गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक शाळेतील आघाडीच्या प्रवेशिकांचे काटेकोर परीक्षण केरून युवातर्फे प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक गटातून एका विजेत्याची निवड करण्यात आली.
युवाचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले, “मास्टरस्ट्रोक ही कल्पकतेची अभिमानास्पद अभिव्यक्ती आहे. या वर्षी या प्रवासात ६,६००हून अधिक शाळा सहभागी झाल्या आणि त्यांचा उत्साह अतुलनीय होता. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही केवळ चित्रकलेचा महोत्सव साजरा करत आहोतच, त्याचप्रमाणे पुढील पिढीचे विचारवंत, भविष्याची स्वप्ने पाहणारे आणि कलाकार घडवत आहोत.
Comments are closed.