NGN News
Latest Marathi News

हेरिटेज फूड्सद्वारा महिला दुग्‍धउत्‍पादक शेतकरी, दूध संकलन केंद्रांचा सन्‍मान

  • जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम; संवाद मेळाव्यात उपाध्यक्षा आणि एमडी श्रीमती भुवनेश्वरी यांचे मार्गदर्शन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

हेरिटेज फूड्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्‍या डेअरी कंपनीने ८ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या ९ राज्यांमधील १८९ चिलिंग सेंटर्सवर (दूध शीतकरण केंद्रे) जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला. या साजरीकरणासह कंपनीने दुग्ध पुरवठा यंत्रणेच्या तळागाळातील महिला सक्षमीकरणाप्रती आपली वचनबद्धता आणखी दृढ केली आहे.  

हेरिटेज फूड्सच्या दूध संकलन नेटवर्कचे आधारस्‍तंभ महिला आहेत. कंपनीच्या ४,६०० हेरिटेज प्रोक्युरमेंट सेंटर्सपैकी (एचपीसी) २,००० पेक्षा जास्त म्‍हणजेच जवळपास ४२ टक्‍के केंद्रे महिलांद्वारे चालवली जातात. देशभरात हेरिटेजशी जोडल्या गेलेल्या तीन लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास ४५ टक्‍के महिला आहेत. महिलांच्या या उल्लेखनीय सहभागामुळे आणि नेतृत्वामुळे प्रेरित होऊन हेरिटेज फूड्सने या वर्षीचा जागतिक महिला दिन त्यांच्या योगदानाला प्रशंसित करत मोठ्या स्वरूपात साजरा केला.

हेरिटेज फूड्सने १८९ चिलिंग सेंटर्सवर आपापल्या केंद्रांच्या आवारात कार्यक्रम आयोजित करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. संस्थेच्या वाढीमध्ये हेरिटेज प्रोक्युरमेंट रिप्रेझेंटेटिव्ह्स असलेल्या महिलांच्‍या योगदानाची दखल घेत त्यांना या साजरीकरणामध्‍ये एकत्र आणण्‍यात आले. युनिटच्‍या व्‍यवस्‍थापकांनी या कार्यक्रमांचे यजमानपद भूषवले, ज्यामध्ये महिला प्रतिनिधींचा (एचपीआर) विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात संस्थेच्या वरिष्ठ नेतृत्वाने विविध युनिट्समधील कार्यक्रमांमध्‍ये उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या साजरीकरणामधून हेरिटेज फूड्सच्या पुरवठा यंत्रणेच्‍या आधारस्‍तंभ असलेल्‍या महिलांच्या कामाचा गौरव करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून आली.

तेलंगणातील शादनगरमधील नंदीगामा गावात आयोजित करण्यात आलेला महिला दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद मेळावा या दिवसाचे खास आकर्षण ठरले. या मेळाव्यात संपूर्ण विभागातून जवळपास ५०० महिला दुग्‍धउत्‍पादक शेतकरी एकत्र आल्या होत्या. हेरिटेज फूड्सने त्यांच्या जनावरांसाठी पशुवैद्यकीय आरोग्य शिबिर, पशुखाद्य आणि पोषण वाटपाचे नियोजन केले होते. तसेच, दुधाची उत्पादकता वाढवणे आणि पशु कल्‍याण या विषयांवर खुल्‍या चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले. या कार्यक्रमात हेरिटेजच्या पुरवठा यंत्रणेमध्‍ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अव्‍वल महिला शेतकऱ्यांचा विशेष गौरव करणारा सत्‍कार सोहळा देखील आयोजित करण्‍यात आला.  

उपस्थितांना मार्गदर्शन करण्‍यासह हेरिटेजचे महिला शेतकऱ्यांप्रती काम, ग्रामीण कौटुंबिक उत्‍पन्‍न वाढवण्‍याप्रती कंपनीचे उपक्रम आणि शेतकरी समुदायांप्रती त्‍यांचे उपक्रम यांबाबत मत व्‍यक्त करत हेरिटेज फूड्सच्‍या उपाध्‍यक्षा व व्‍यवस्‍थापकीय संचालिका श्रीमती भुवनेश्वरी नारा म्‍हणाल्‍या, ”गेल्या ३३ वर्षांपासून हेरिटेज फूड्सने आपल्या शेतकरी बांधवांसोबत एका कुटुंबाप्रमाणे प्रवास केला आहे आणि या प्रवासात महिलांना नेहमी प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. आज, आमची ४२ टक्‍के दूध संकलन केंद्रे महिलांकडून चालवली जातात आणि आमचे जवळपास ४५ टक्‍के शेतकरी भागीदार महिला आहेत. ही फक्त आकडेवारी नाही तर यामधून आमचा विश्वास दिसून येतो की, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा तिचे कुटुंब सक्षम होते, तिचे गाव सक्षम होते आणि पर्यायाने राष्ट्र सक्षम होते. आमच्या महिला शेतकरी आणत असलेला दुधाचा प्रत्येक लिटर हा त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या स्वाभिमानाचा आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्या घडवत असलेल्या भविष्याचा पुरावा आहे. हेरिटेजमध्ये, आम्ही त्यांच्‍या योगदानाला प्रशंसित केले जावे, त्यांचे पेमेंट पारदर्शक व वेळेवर व्हावे आणि त्यांचे नेतृत्व सतत वाढत राहावे, यासाठी कटिबद्ध आहोत.

तसेच, नऊ राज्यांमधील हेरिटेज फूड्सच्या चिलिंग सेंटर्सवर आपापले महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये कंपनीचे अधिकारी स्थानिक महिला शेतकऱ्यांसोबत सक्रियपणे सहभागी झाले होते.

Comments are closed.