NGN News
Latest Marathi News

नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेची गळफास घेत आत्महत्या

  • डॉ. मनीषा जेजुरकर यांचे टोकाचे पाऊल; वैद्यकीय क्षेत्रात हळहळ

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : एका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याने नाशिक शहर हादरले आहे. डॉ. मनीषा जेजुरकर असे त्यांचे नाव असून त्या गंगापूर रोड परिसरात वास्तव्यास होत्या. जिल्हा शासकीय रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ.  नीलेश जेजुरकर यांच्या त्या पत्नी होत. डॉ. मनीषा यांच्या या टोकाच्या निर्णयाने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, डॉ. मनीषा जेजुरकर यांचे शरणपूर रोड परिसरात खासगी रुग्णालय आहे. शुक्रवारी त्यांनी स्वतःच्या घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब लक्षात आलेल्या त्यांचे बंधू गौरव भास्कर यांनी डॉ. मनीषा यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तथापि, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, त्यांच्या या टोकाच्या निर्णयाने हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments are closed.