NGN News
Latest Marathi News

नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता संस्थेतर्फे जि. प. शाळेस पाण्याची टाकी भेट

  • शालोपयोगी वस्तू, खाऊचे वाटप; संस्थेतर्फे अनेक वर्षापासून विविध उपक्रम

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक रोड : येथील वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी इगतपुरी तालुक्यातील कुथ्रुंगण या गावातील जिल्हा परिषद शाळेस संस्थेच्या वतीने एक हजार लिटरची पाण्याची टाकी भेट म्हणून देण्यात आली सदर शाळेत इयत्ता बालवाडी ते पाचवी चे विद्यार्थी असल्यामुळे सदर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू खाऊचे वाटप तसेच शाळेसाठी डस्टबिन देण्यात आल्या. नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील मगर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्रथमता शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत गीत गाऊन स्वागत केले. शासनाच्या विविध स्तरावर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवली आहे त्यातल्या विद्यार्थ्यांनी त्यांची पारितोषिके अध्यक्ष तसेच वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांना दाखवण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय चव्हाण सर तसेच शिक्षक अमोल बावासर तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ अलका जाधव मॅडम त्याचबरोबर शाळेसाठी आपली जमीन देणारे श्री चंद्रर डिगेबाबा व सर्व वृत्तपत्र विक्रेता बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण गावातील नागरिक उपस्थित होते त्यामध्ये श्री संतोष जाधव अनिल भोईर राहुल भोईर भागीरथ जाधव गोरख भाऊ डिगे दुंष भोईर संपत बाबा भोईर सौ मथुरा डाखोरे उषा जाधव अंगणवाडी कर्मचारी सौ गौरी डहाळे उषा जाधव निर्मला पुराने सोनाली डिगे सौ भारती भोईर या सर्वांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेते बांधव रवी भोसले, उल्हास कुलथे, विजय सोनार, किशोर सोनवणे, महेश कुलथे, वसंत घोडे, विकास रहाडे, रवी सोनवणे, उत्तम गांगोडे, अनिल कुलथे, जय भालेराव हे विक्रेते बांधव उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील मगर यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Comments are closed.