NGN News
Latest Marathi News

‘राष्ट्रवादी’मध्ये आता ‘वहिनी’ पर्व.. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

  • राष्ट्रीय कार्यकारिणीत सर्वानुमते सहमती;  पार्थ यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्यास सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली.

 राष्ट्रवादीच्या आजच्या मुंबईतील बैठकीसाठी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, पार्थ पवार, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. आपल्याला अजित पवारांच्या आदर्शावर पुढे जायचे आहे. आता आपण नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वात आपली वाटचाल करणार आहोत. यासाठीच आपण सर्वजण याठिकाणी एकत्र आलो आहोत. सगळ्या प्रांतातील लोकं याठिकाणी आले आहेत, असे म्हणत प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष केल जावे, असा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी मांडला. त्यानंतर, सर्वांनी हात उंचावत सहमती दर्शवली. काही दिवसांपूर्वीच या संदर्भांत निर्णय घेण्यात आला होता, आज फक्त औपचारिक घोषणा करण्यात आली.

दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडेही राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत  आहे.

Comments are closed.