NGN News
Latest Marathi News

बर्ड पार्कमध्ये सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची आनंददायी सहल

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणे नगरतर्फे इयत्ता पहिली व प्री-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांसाठी Bird Park, Mhasrul येथे आनंददायी सहलीचे आयोजन करण्यात आले.

या सहलीत विद्यार्थ्यांनी विविध पक्षी व प्राण्यांना जवळून पाहण्याचा आनंद लुटला. पोपट, बदके, इग्वाना तसेच गोंडस सशांना पाहून मुलांचा आनंद ओसंडून वाहत होता . निसर्गाच्या सान्निध्यात मिळालेला हा अनुभव त्यांच्या दृष्टीने अत्यंत संस्मरणीय ठरला. याशिवाय विद्यार्थ्यांना पक्ष्यांविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ दाखविण्यात आले, त्यामुळे ही सहल केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता शैक्षणिकदृष्ट्याही उपयुक्त ठरली.

ही सहल यशस्वी आणि संस्मरणीय करण्यासाठी मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभागप्रमुख शीतल चिंचोलीकर व भाग्यश्री मराठे यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमाबद्दल शाळेतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Comments are closed.