* चिमुकल्यांच्या नाच गाण्याचा घेतला पालकांसह ग्रामस्थांनी आनंद
संतोष बिरे
वावी : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील संजीवनी बाल विद्यामंदिराच्या वतीने महोत्सवानिमित्त बुधवारी बाल महोत्सव कार्यक्रम व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वेलजळी, डॉ.रमेश देव्हाड अधीक्षक राहुल मुळे सर, हर्षल राजे भोसले ,किरण कांदळकर निलेश माळी ,निवृत्ती संधान आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षिका निर्मला देव्हाड यांनी पाहुण्यांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश वेलजाळी यांनी मुलांचे कौतुक केले व अधीक्षक राहुल मुळे यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. चिमुकल्यांनी छान वेशभूषा करून नृत्य सादर केले व पाहुण्यांच्या हातून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सर्व माता-पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उषा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments are closed.