NGN News
Latest Marathi News

सगुणा फाऊंडेशन ग्रुपतर्फे शिवजन्मोत्सव, अभिवादन सोहळा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : सालाबादप्रमाणे या वर्षीही रयतेचा राजा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजन्मोत्सव दिनानिमित्ताने सगुणा फाऊंडेशन ग्रुपच्या वतीने शशिकांत उपासनी व ॲड पी. डी. काळे यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे यांनी नवनिर्वाचित नगरसेवक राहुल दिवे, प्रथमेश गिते, सिमाताई पवार, सचिन मराठे, अशाताई तडवी, ज्योती अनिल जोधंळे, कमलेश बोडके याचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद कुलकर्णी., पी. डी. नाना शिलेदार, कुणाल गायकवाड, बाळासाहेब जानमाळी , रमेश साळवे, डॉक्टर सुभाष काळे, दिनकर दाणी, प्रकाश मामा सोनवणे, गजुभाऊ घोडके, संजय मंडलिक, हिरामण काठे,ॲड. संजय खरे, संदीपभाऊ डोळस, योगेश नन्नवरे, वंदनाताई नागवंशी, भारतीताई शेलार, लताताई वाघ, भारतीताई पाटील, सुरेखाताई वाघ,भालचंद्र जाधव, अशोक जोशी, संजय देवरे, रविंद्र सोनोने, जयराम वाघ, विषालभाऊ पवार, संजय वानखेडे, नितीन काळे, संजय तेजाळे, आशिष चौरसिया, आबांदास बोराडे, शामदादा उपासनी, रविंद्र कुलकर्णी, बोरसे सर, बिहाडे साहेब, बाळुभाऊ सोनवणे, भुषण महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे सेक्रेटरी दीपक कटारे, विजय अहिरे, यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमास संस्थेचे राजाभाऊ शेळके, सुधीर गायकवाड, लभिब मुल्ला, अरुण भाऊ शहाकर, सुशील बर्वे, नाना तेजाळे, प्रवज्जा गांगुर्डे, मनिषा काळे यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Comments are closed.