NGN News
Latest Marathi News

क्रोमा समर सेलमध्ये एसी, प्रीमियम टीव्हीवर ७१% पर्यंत भरघोस सूट !

  • २८ फेब्रुवारीपर्यंत टॉप ब्रँड्सवर सर्वोत्तम डील्स !
  • सोबतच एक्स्चेंज बेनिफिट्स, कॅशबॅक आणि बँक कार्ड्सवर एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतातील आघाडीची ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर कंपनी आणि टाटा समुहातील एक सदस्य, क्रोमा ने ‘क्रोमा समर सेल २०२६’ ची घोषणा केली आहे. उन्हाळ्याची चाहुल लागायला सुरुवात झाली आहे, त्यासाठीच क्रोमाने आपल्या ग्राहकांसाठी कूलिंग सोल्यूशन्स आणि दैनंदिन वापराच्या टेक ॲक्सेसरीजवर शानदार डील्स आणल्या आहेत. हा सेल देशभरातील क्रोमा स्टोअर्समध्ये २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार असून यामध्ये निवडक उत्पादनांवर विशेष सवलती, कॅटेगरी ऑफर्स आणि मर्यादित कालावधीसाठीच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. यासोबतच, पार्टनर बँक किंवा फायनान्स अटींच्या अधीन राहून कॅशबॅक आणि सुलभ ईएमआयचे पर्यायही उपलब्ध आहेत. उत्पादनांच्या किमती आणि ऑफर्स ब्रँड, मॉडेल, स्टोअर, शहर आणि उपलब्धतेनुसार बदलू शकतात. याव्यतिरिक्त, एचडीएफसी टाटा नेउ क्रेडिट कार्ड वापरणारे ग्राहक निवडक उत्पादनांवर १०% पर्यंत सवलतीचा आनंद घेऊ शकतात.

उन्हाळ्याला मात देणं आता होईल अगदी सोपं! कारण क्रोमा समर सेलमध्ये एअर कंडिशनर्सवर मिळत आहेत धमाकेदार ऑफर्स; आता नवीन सीझनच्या लेटेस्ट मॉडेल्ससह तुमचे घर राहील एकदम थंडगार! क्रोमा समर सेल २०२६ मध्ये सिंफनी आणि क्रोमा च्या एअर-कूलर्सवर देखील जबरदस्त डील्स उपलब्ध  आहेत.उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत मनोरंजन आणि खेळांचा आनंद लुटण्यासाठी, विशेषतः T20 वर्ल्ड कपच्या काळात, क्रोमामध्ये मिळत आहेत खास डील्स! यामध्ये मोठे टेलिव्हिजन, क्यूएलईडी आणि प्रीमियम बिग-स्क्रीन मॉडेल्सवर विशेष सवलती दिल्या जात आहेत, जेणेकरून तुमच्या घरी मॅच पाहण्याचा अनुभव अधिकच शानदार होईल.

इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, “उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्राहक कूलिंग सोल्यूशन्स आणि होम अपग्रेड्सच्या खरेदीला प्राधान्य देऊ लागतात. आजचा ग्राहक केवळ सर्वोत्तम मूल्यच नाही, तर सुलभ फायनान्स आणि विश्वासार्ह तज्ञांचा सल्लाही शोधत असतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘क्रोमा समर सेल’मध्ये दिल्या जात आहेत भरघोस डील्स आणि शानदार ऑफर्स एअर कंडिशनर्स आणि मोठ्या स्क्रीनच्या टेलिव्हिजनवर. त्यासोबत इतर कॅटेगरीमध्येही भरपूर बचत करण्याची संधी आहे. यांचा लाभ घेऊन आमचे ग्राहक आत्मविश्वासाने अपग्रेड करू शकतील आणि या सीझनचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील.”

Comments are closed.