NGN News
Latest Marathi News

पिंपळनेर नगरपरिषद हद्दीतील गांधी चौकात अतिक्रमण हटवा

  • नगराध्यक्षा योगिता चौरेंना सामाजिक कार्यकर्ते मयुर कासार यांचे निवेदन

** अंबादास बेनुस्कर

पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क

साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.०६ मधील गांधी चौक (मुख्य चौक) येथील रस्त्याचे व पाईपलाईन,गटारीचे काम होत आहे. तरी सदरचे काम हे चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे दिसून येत आहे.
नगर भुमापन पिंपळनेर यांचे कडील अभिलेखाचे अवलोकन करून सदरच्या चौकामधील अतिक्रमण काढून रस्त्याचे व पाईपलाईन,गटारीचे काम करण्यात यावे.मागील कार्यकाळात ग्रामपंचायत असताना जितेंद्र पंडित कोठावदे यांनी दमबाजीने धाडस करून रस्त्यावर पक्के बांधकाम करून घेतलेले आहे. तरी चौकामधील रस्त्याच्या काही क्षेत्रावर अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे.तसेच गटारीची दिशाही स्वतःच्या मर्जीने बदलून घेतली आहे. यामुळे इतर नागरिकांनाही संधी मिळण्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिक आपल्या मर्जीने बांधकाम करीत आहेत. तरी भविष्यात अतिक्रमण वाढू नये. त्यामुळे रस्त्याचे क्षेत्र कमी होत आहे व शासन झोपेचे सोंग घेत असलेचे दिसून येत आहे. यासंदर्भात नगराध्यक्षा योगिता चौरेंना सामाजिक कार्यकर्ते मयुर कासार यांनी निवेदन देत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे.

गांधी चौक येथे इतिहासातील थोर पुरुष विनोबा भावे, महात्मा गांधीजी हे प्रत्यक्ष येवून सदरच्या चौकाचे नामकरण केलेले आहे.तसेच लोकमान्य टिळक यांनी लोकमान्य टिळक ग्रंथालयात भेट देवून ग्रंथालयाला प्रेरणा दिलेली आहे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देखील पूर्वी गांधी चौक येथे आपली उपस्थिती दाखवून प्रेरणा दिलेली आहे.अशा अनेक थोर पुरुषांनी या चौकात स्वतःयेवून गावातील नागरिकांना संस्कृती जपण्याची प्रेरणा दिलेली आहे. या चौकात गेल्या शतकापासून सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होत आहे आणि भविष्यातही परंपरेनुसार हे सामाजिक व धार्मिक कार्य कायम राहणार आहे.

यावरून अशा इतिहासिक चौकात सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अपेक्षित जागा उपलब्ध राहणे गरजेचे आहे.अनेक वर्षापासून देखील या गांधी चौकात स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन (राष्ट्रीय ध्वजाचा) कार्यक्रम साजरा होत आहे.या कार्यक्रमासाठी तसेच परंपरेनुसार गणेश उत्सव,श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराज यात्रोस्तव व नवरात्री उत्सव साजरी करत असतांना अनेक अडचणी निर्माण होत असतात.यामुळे नागरिकांची एकाच ठिकाणी जमाव (गर्दी) होत असते.अशा अनेक अडचणींना चौकामधील नागरीकांना सामोरे जावे लागते,तरी आपले स्तरावरून अतिक्रमण धारकांवर योग्य ती कार्यवाही करून अतिक्रमण काढून रस्त्याचे,पाईपलाईन व गटारींचे काम करण्यात यावे व भविष्यात कोणीही अतिक्रमण करू नये यावर नियंत्रण ठेवण्यात यावे.व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात नमुद करण्यात आले आले.

Comments are closed.