नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सने आयसीआयसीआय प्रू स्मार्टकिड 360 लाँच केला आहे. ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे, जी पालकांना त्यांच्या मुलाच्या भविष्यातील खर्चासाठी पैसे जमा करण्यास आणि योजना बनवण्यास मदत करते. या योजनेत गॅरंटीड फायदे देखील मिळतात.आयसीआयसीआय प्रू स्मार्टकिड 360, हा प्लॅन मुलाच्या भविष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांसाठी मदत करतो – जसे की शाळा, उच्च शिक्षण, किंवा तरुण वयातील महत्वाचे उद्दिष्टे. यामध्ये मनीबॅक किंवा ठराविक पेमेंट्स मिळते. खास गोष्ट म्हणजे, पालकांना हवे असल्यास ठराविक रक्कम किंवा वाढती रक्कम म्हणून पेमेंट घेण्याचा पर्याय निवडता येतो.
या लॉंचबद्दल बोलताना, विकास गुप्ता, चीफ प्रॉडक्ट ऑफिसर, आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्स यांनी सांगितले,“आयसीआयसीआय प्रू स्मार्टकिड 360 हा प्रोडक्ट पालकांना त्यांच्या मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यास मदत करण्यासाठी तयार केला आहे. या पॉलिसीमध्ये मनीबॅक फायदे आहेत आणि पॉलिसी संपल्यानंतर मुलाला ठराविक रक्कमेची गॅरंटीड मॅच्युरिटी बेनिफिट मिळते, जी त्याच्या प्रौढ वयात त्याला आर्थिक आधार देऊ शकते.या योजनेची आणखी खास गोष्ट म्हणजे, प्रीमियममध्ये सवलत आणि फायदे सुरू ठेवण्याची सुविधा. जर पालकाचे अचानक निधन झाले, तर भविष्यातील सर्व प्रीमियम माफ केले जातात, लाइफ कव्हर रक्कम नॉमिनीला दिली जाते आणि पॉलिसीतील इतर फायदे चालू राहतात. यामुळे मुलाचे भविष्य आणि त्याची उद्दिष्टे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरक्षित राहतात.मुख्य फायद्यांव्यतिरिक्त, आयसीआयसीआय प्रू स्मार्टकिड 360 मध्ये काही ऐच्छिक सुविधा देखील आहेत, त्यापैकी एक म्हणजे फॅमिली इन्कम बेनिफिट, जी पालकाच्या अचानक मृत्यूच्या परिस्थितीत कुटुंबाला नियमित उत्पन्न देऊन आर्थिक आधार देते.
Comments are closed.