NGN News
Latest Marathi News

जेष्ठ विधिज्ञ नंदकिशोर भुतडा ‘अनवार-ए-उर्दू’ पुरस्काराने सन्मानित

  • मुबंई विद्यापीठाच्या उर्दू विभागातर्फे नाशिककर उर्दूप्रेमीच्या सर्जनशीलतेप्रती कृतज्ञता व्यक्त

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागातर्फे विद्यापीठ कॅम्पस मधील फिरोजशाह मेहता भवन येथे एक भव्य आणि ‘जश्न-ए-उर्दू’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात नाशिक शहरातील प्रख्यात जेष्ठ विधिज्ञ आणि उर्दूप्रेमी ॲडव्होकेट नंदकिशोर भुतडा यांना ” अनवार-ए-उर्दू पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा सन्मान मुंबई शहराचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आदरणीय कैसर खालिद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात उर्दू जगतातील मान्यवर कवी, साहित्यिक तसेच प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. त्यामध्ये श्री शाहिद लतीफ (संपादक, इन्कलाब), श्री कासिम इमाम, हमीद इकबाल सिद्दीकी, यशवंतराव चव्हाण विद्यापीठचे उर्दू विभाग प्रमुख डॉ राशीद अशरफ, मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाचे प्रमुख श्री कमर सिद्दीकी आणि प्रा. जाकिर खान जाकिर यांचा समावेश होता. उपस्थितांनी ॲडव्होकेट नंदकिशोर भुतडा यांच्या उर्दू भाषा व साहित्याशी असलेला प्रेम आणि त्यांच्या उर्दू भाषेसाठी केलेल्या योगदानाबद्दल भरभरून कौतुक करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना ॲडव्होकेट नंदकिशोरजी यांनी मुंबई विद्यापीठाचे व उर्दू भाषा विभागाचे आभार मानले व कृज्ञता व्यक्त केली. उर्दू भाषा व संस्कृतीशी असलेल्या दीर्घकाळच्या जिव्हाळ्याचे अनुभव अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त केले. सदर सोहळ्यात नंदकिशोर भुतडा साहेबांच्या उर्दू आत्मचरित्र ‘यादश-ब-खैर’ च्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते झाले.

कार्यक्रमाचे वातावरण शैक्षणिक व साहित्यिक रंगांनी नटलेले होते. उपस्थितांनी या सेवाभावाच्या गौरवाला उर्दू भाषेच्या प्रसारासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला. सदर ‘जश्न-ए-उर्दू’ या तीन दिवसीय कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थी, रिसर्चर, उर्दू रसिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.