NGN News
Latest Marathi News

क्रिएटिव माइंडस स्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गांधीनगर येथील क्रिएटिव माइंडस स्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एड. एकता कदम आणि वृत्तवाहिनी संपादक विलास सूर्यवंशी हे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जोंधळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सदर केली, शिवाय, देशभक्ती अधोरेखित करणारी भाषणे सादर केली. चिमुकल्यांच्या सर्जनशिल्तेला उपस्थित अतिथी आणि पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी कविता गुरव, पूजा वानखेडे, आशा दिवे, सोनाली गेडाम, पौर्णिमा शर्मा या शिक्षिकांसह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Comments are closed.