- भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; संशयित पती फरार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
प्रेमविवाह केलेल्या एका उच्चशिक्षित विवाहितेला विष पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शहरात उघड झाली आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या या विवाहितेला आधी जिल्हा रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात उप्चारथ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, महिमा मॉन्टी राजदेव असे पिडीत विवाहितेचे नाव आहे. पिडीतेचा गेल्या एप्रिल २०२५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. तथापि, प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून महिमाचा सातत्याने छळ करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. काही महिन्यांपासून महिमाला सासरे, सासू आणि दिराकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. चोरीच्या संशयावरून तिच्या घरातील बेडरूममध्येही कॅमेरे लावण्यात आल्याचा धक्कादायक दावा तिच्या आईने केला आहे. सोमवारी नवरा मॉन्टी राजदेव याने पिडीतेला मारहाण करत विषारी औषध जबरदस्तीने पाजल्याचा आरोप आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या महिमाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेनंतर संशयित पती फरार झाल्याची माहिती असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
Comments are closed.