- प्रोटीन रिच रेसिपी ठरली परीक्षकांची पसंती ; प्रशस्तीपत्र देवून सन्मान
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राजूर बहुला येथील एम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राची मास्टरशेफ २०२६’ स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत सुप्रसिद्ध मिराकी ब्रांडच्या संचालिका ज्योती कुटे यांनी गुजराती प्रोटीन रिच रेसिपी सादर करीत परीक्षकांसह उपस्थितांची पसंती मिळवली.
नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेसाठी ख्यातकीर्त ‘मधुराज रेसिपी’च्या मधुरा मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली. स्पर्धेत मोठ्या संख्येने महिला स्पर्धक सहभागी झाल्या. यावेळी विविध प्रकारच्या टेस्टी रेसिपीज आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. परीक्षकांनी अर्त्यंत सूक्ष्म पद्धतीने परीक्षण करून अंतिम निकाल जाहीर केला. त्यामध्ये सुप्रसिद्ध मिराकी ब्रांडच्या संचालिका ज्योती कुटे यांच्या प्रोटीन रिच रेसिपीलाही गौरवण्यात आले. ज्योती कुटे यांनी गुजराती पारंपरिक हांडवो रेसिपीला मॉडर्न ट्वीस्ट देत लॉलीपॉप शेप दिला. ही बाब परीक्षकांना आस्वाद, सादरीकरण आणि नाविन्य या मुद्द्यांवर भावली.
याप्रसंगी मधुरा मॅडम यांच्या हस्ते ज्योती कुटे यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. एम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या संचालिका सुनिता सोनी यांच्यासह स्पर्धक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments are closed.