मालेगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मालेगाव तालुक्यातील गिरणा सहकारी कारखान्याच्या खरेदी व्यवहारावरून खा. राऊत यांनी मंत्री भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
साधारण पंधरा वर्षांपूर्वी गिरणा सहकारी कारखान अवसायानात निघाला होता. त्यावेळी संबंधित साखर कारखाना मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित एका कंपनीने केवळ २७.१५ कोटींना खरेदी केला होता. सदर व्यवहार होत असताना भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कारखान्याचे भागभांडवल जमा केल्याचे सांगण्यात येत होते. याच मुद्द्यावर खा. राऊत यांनी भुसे यांच्यावर आरोप केले होते. भुसे यांनी शेतकऱ्यांकडून सुमारे १७८ कोटी रुपये गोळा केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केल्याने खळबळ उडाली होती. या आरोपानंतर भुसे यांनी खा. राऊत यांच्याविरोधात मानहानी दावा ठोकला होता. त्याची सुनावणी मालेगाव न्यायालयात सुरु होती. पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर न्यायालयाने खा. राऊत यांना दोषी धरत त्यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.
Comments are closed.