- सिटी सेंटर मॉलमध्ये ग्रेट डेनिम स्टोअरचे उद्घाटन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिकमधील डेनिमप्रेमींसाठी त्यांचे वॉर्डरोब्स अपग्रेड करण्याची नवीन संधी मिळाली आहे. पेपे जीन्स लंडन या ब्रिटीश स्ट्रीट संस्कृतीमध्ये रूजलेल्या आणि ग्रेट डेनिमसाठी ओळखल्या जाणारा जागतिक स्तरावरील डेनिम व लाइफस्टाइल ब्रँडने सिटी सेंटर मॉलमध्ये आपल्या स्टोअरचे उद्घाटन केले आहे, ज्यासह महाराष्ट्रातील झपाट्याने विकसित होत असलेल्या लाइफस्टाइल हबमध्ये दिमाखदार पदार्पण केले आहे.
रिटेल स्पेसपेक्षा अधिक म्हणून डिझाइन करण्यात आलेले नवीन पेपे जीन्स लंडन स्टोअर ग्राहकांना सर्वोत्तम ब्रँड अनुभव देते, जेथे कालातीत डेनिम, समकालीन सिल्हूट्स आणि सीझन-रेडी स्टाइल्स एकत्र पाहायला मिळतील. कधीही फॅशनच्या बाहेर न जाणारे क्लासिक फिट्स असोत किंवा ट्रेंडनुसार रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी असोत या स्टोअरमध्ये महिला आणि पुरुषांसाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलेले विशेष कलेक्शन उपलब्ध आहे.
हे स्टोअर नाशिकमधील स्टाइलप्रेमी ग्राहकांसाठी पसंतीचे फॅशन गंतव्य बनण्यास सज्ज आहे. दररोज परिधान करता येतील अशा आकर्षक डेनिम, कॅज्युअल वेअर आणि लंडनमधील स्ट्रीट संस्कृतीमधून प्रेरित आकर्षक पोशाखांसह पेपे जीन्स लंडन अद्वितीय फॅशन देते, जी वास्तविक, आत्मविश्वासपूर्ण आणि वैयक्तिक वाटते.
या लाँचसह पेपे जीन्स लंडनने महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे, तसेच जागतिक डेनिम संस्कृतीशी संलग्न होण्याचा आणि प्रत्येक शहरामध्ये आपल्या ग्रेट डेनिम उपलब्ध करून देण्याचा आपला प्रवास सुरूच ठेवला आहे. पेपे जीन्स चे स्टोअर शॉप क्र. ८, सिटी सेंटर मॉल उंटवाडी, लवाटे नगर,नाशिक, महाराष्ट्र – ४२२००२ येथे स्थित आहे.
Comments are closed.