NGN News
Latest Marathi News

चाटोरी येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कै. बाळासाहेब (भाऊ) वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ उपक्रम

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

 के के वाघ शिक्षण संस्था, नाशिक, के के वाघ फाऊंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाऊंडेशन, स्माईल व स्पिनॅच यांचे संयुक्त विद्यमाने आदरणीय कै. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार ( दि. ११ ) सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ज्ञानगोदावरी सार्वजनिक वाचनालय, चाटोरी ता.निफाड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

मणिशंकर आय हॉस्पिटल, नाशिकच्या संचालिका व प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्राची पवार, श्री साई बाबा हार्ट इन्स्टिट्यूट, नाशिकचे संचालक व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी आणि नामको, हाॅस्पीटल,नाशिक येथील नामवंत डाॅक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी पार पडणार आहे. 

यावेळी चाटोरी, रामनगर, सोनगाव आणि सावळी या गावांतील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ, संचालक मंडळ, जनसंपर्क संचालक अजिंक्य बाळासाहेब वाघ व सचिव प्रा. के. एस. बंदी यांनी केले आहे. तरी नागरीकांनी नाव नोंदणीसाठी राहुल पोटे (७५०७७८४३९६)  व  अमोल खालकर (९०९६८९९३६४) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी.

Comments are closed.