NGN News
Latest Marathi News

व्यसनी पित्याला मुलाने यमसदनी धाडले; नांदगावच्या जातेगावातील घटना

  • लोखंडी पाईपने डोक्यावर जोरदार वार करून संपवले; खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक : एनजीएन न्यूज नाशिक

दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून मुलानेच जन्मदात्याला संपवल्याचा धक्कादायक प्रकार नांदगाव तालुक्यातील जातेगाव शिवारात उघडकीस आला आहे. विठ्ठल तुकाराम गायकवाड (५८) असे मृत पित्याचे नाव असून याप्रकरणी मुलगा श्रीकृष्ण गायकवाड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (दि. ५) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विठ्ठल गायकवाड यांचा मृतदेह मळ्यातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. विठ्ठल गायकवाड यांच्या डोक्यावर, तोंडावर व ओठांवर गंभीर जखमा दिसून आल्या. बिछान्यावरही मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. यासंदर्भात, नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून चौकशी सुरू असता मृताचा मुलगा श्रीकृष्ण गायकवाड याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलगा श्रीकृष्ण याने जमलेल्या लोकांसमक्ष गुन्ह्याची कबुली दिली. 

वडील विठ्ठल गायकवाड हे. दारूच्या नशेत नेहमी शिवीगाळ व मारहाण करत असत. शनिवारी शेतात वडिलांनी करंटच्या तारा लावून आपला जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मुलाने केला. याच वादातून वडील आपल्याला ठार मारतील, अशी भीती मनात निर्माण झाल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतला. झोपेत असलेल्या वडिलांचा आपण लोखंडी पाईपने डोक्यावर जोरदार वार करत त्यांचा जागीच खून केला, अशी कबुली त्याने  पोलिसांनी आरोपी श्रीकृष्ण गायकवाड यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

Comments are closed.