नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सातारा येथे सुरु असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांना संस्कृती पुस्तक व दिनदर्शिका भेट देण्यात आली. संस्कृती परिवाराचे अध्वर्यू आणि राज्याचे माजी माहिती संचालक शिवाजी मानकर यांनी पाटील यांना हा अनोखा सांस्कृतिक ठेवा भेट दिला.
पाटील यांनी संस्कृती पुस्तक व दिनदर्शिकेचा स्वीकार करीत त्यामधील मौलिक माहितीस्त्रोताचे कौतुक करून संस्कृती परिवाराला शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.